कोरोना रुग्णांना SBI ची भेट ! किरकोळ व्याजदरावर मिळेल 5 लाखापर्यंत कर्ज

नवी दिल्ली : वृत्त संस्था – SBI | कोरोना (Corona) च्या या काळात अनेक लोक असे आहेत ज्यांना नोकरी गमवावी लागली किंवा सॅलरीत कपात झाली आहे. या मुळे आर्थिक बाबतीत लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, आता या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात देशातील सर्वात मोठी बँक (Bank) असलेल्या एसबीआय (SBI) ने पुढाकार घेतला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

5 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज :

एसबीआय (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली. या योजनेचे नाव कवच पर्सनल लोन आहे, ज्या अंतर्गत ग्राहक पाच लाख रूपयांच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. हे लोन त्यांना पाच वर्षासाठी दिले जाईल आणि या लोनवर व्याजदर अवघा 8.5 टक्के असेल. या योजनेत तीन महिन्यांचा मोरेटोरियम सुद्धा मिळेल.

म्हणजे ग्राहकाला लोन घेतल्यानंतर 3 महिन्यांपर्यंत हप्ता द्यावा लागणार नाही. परंतु नंतर चार्जेससह पैसे परत करावे लागतील. योजनेंतर्गत कोरोना उपचारसाठी असलेला खर्च सुद्धा भरू शकता.

काय आहे फायदा :

ही नवीन योजना लोकांना कोणत्याही त्रासाशिवाय कोविड उपचारासंबंधी खर्चाची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत देईल. या शिवाय ग्राहक पर्सनल लोनच्या सामान्य दरापेक्षा खुप कमी दराचा सुद्धा लाभ घेऊ शकतील. सामान्यपणे बँका पर्सनल लोनवर व्याजदर 11 ते 16 टक्केच्या दरम्यान लावतात. अशाच प्रकारे मोरेटोरियम त्या ग्राहकांसाठी योग्य आहे ज्यांच्याकडे तात्काळ हप्ता देण्याची व्यवस्था होऊ शकत नाही.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : sbi launches kavach personal loan for covid patients know interest rate and other details


हे देखील वाचा

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात लवकरच खांदेपालट? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Sanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल

Pune News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन

Ajit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…

Pune News | पिस्तुल बाळगणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Pune News | दुर्देवी ! बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर मृत्यू

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23 डॉक्टरांनी गमावले प्राण