… तर SBI च्या ‘या’ ग्राहकांचं कार्ड होणार बंद ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी बँकेकडून महत्वाची सूचना देण्यात आली आहे. कारण एसबीआयचे जुने एटीएम कार्ड जर तुम्ही बदलले नसेल तर तुमच्या कार्डची सेवा आता बंद होणार आहे. त्यामुळे जुन्या मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड ऐवजी आता ग्राहकांना नवीन आणि अधिक सुरक्षित कार्ड घ्यावे लागणार आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना आवाहन केले आहे की ग्राहकांनी आपले अत्याधुनिक ईएमव्ही चिप असलेले कार्ड 31 डिसेंबर 2019 पूर्वी बँकेतून घ्यावे.

त्यासाठी ग्राहकांना आपल्या होम ब्रांचला जाऊन 31 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा लागेल. त्यानंतर नवे ईएमव्ही चिप असलेले कार्ड आणि पिन ग्राहकांना देण्यात येईल. अधिकृत आणि ऑनलाइन पेमेंटसाठी पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित व्यवहार करा असे आवाहन एसबीआयकडून ग्राहकांना करण्यात आले आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनानुसार एसबीयने आपले मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड अत्याधुनिक आणि सुरक्षित ईएमव्ही चिपमध्ये अपग्रेड केले आहे. हे कार्ड बदलून घेणे मोफत असणार आहे. ग्राहकांना फक्त आपल्या होम ब्रांचला जावे लागेल आणि अर्ज करावा लागेल, यासाठी कोणतेही शुल्क आकरले असेल तर ते पुराव्यासह दाखवा आणि ग्राहकांना रिफंड देण्यात येईल असे बँकेने सांगितले.

इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून देखील ईएमव्ही चिप कार्डमध्ये अपग्रेड करता येते. परंतू अर्ज करण्यासाठी तुमचा पत्ता योग्य आहे का याची अगोदर खात्री करुन घ्या. कारण ऑनलाइन अर्ज केल्यावर कार्ड नोंदणीकृत पत्यावर येईल. यासाठी मोबाईल नंबर अनिवार्य आहे.

असा करा ऑनलाइन अर्ज
1) एसबीआयच्या वेबसाइटवर लॉगिंन करा.

2) टॉप नेव्हिगेशनमध्ये ई सर्व्हिसेसमध्ये एटीएम कार्ड सेवा निवडा.

3) व्हॅलिडेट करण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा. त्यानंतर युझिंग वन टाईम पासवर्डवर क्लिक करा.

4) नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी मागवा.

5) अकाऊंट निवडा आणि त्यात कार्डवरील नाव आणि प्रकार टाका.

6) शर्ती आणि अटी वर क्लिक करा आणि पुन्हा सबमिट करा.

7) सबमिट स्क्रीनवर मेसेज येईल त्यात लिहिलेले असेल कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर आठवड्याभराच्या कालावधीत येईल.

Visit : policenama.com