SBI MCLR Rate | एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! महाग होणार तुमचे लोन, SBI बँकेने MCLR मध्ये केली 0.10% वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI MCLR Rate | तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे State Bank of India (SBI) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. State Bank of India (SBI) ने सर्व मुदतीसाठी एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांनी वाढवले आहेत (SBI Customer News Today). बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, नवीन दर 15 एप्रिलपासून लागू होणार आहेत.

 

दर काय आहेत नवीन
SBI च्या वेबसाइटनुसार, ग्राहकांसाठी एका रात्रीपासून तीन महिन्यांसाठी कर्ज दर (MCLR) 6.65% ऐवजी 6.75% असेल. तर 6 महिन्यांसाठी 6.95 टक्क्यांऐवजी 7.05 टक्के असेल.

 

SBI MCLR
एका वर्षाच्या MCLR साठी 7.10%, दोन वर्षांसाठी 7.30% आणि तीन वर्षांसाठी 7.40% व्याज भरावे लागेल. (SBI MCLR Rate)

 

MCLR म्हणजे काय ?
भारतात एमसीएलआर प्रणाली 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केली होती. हा कोणत्याही वित्तीय संस्थेसाठी अंतर्गत बेंचमार्क आहे.
एमसीएलआर प्रक्रियेत, कर्जासाठी किमान व्याजदर निश्चित केला जातो.

 

Web Title :- SBI MCLR Rate | state bank of india increased mclr rate by 10 basis points know all important point here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा