SBI सुरू करतय ‘लिलाव’, अर्ध्या किंमतीत खरेदी करा ‘प्रॉपर्टी’ ! जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एसबीआय बँक 5 नोव्हेंबर 2019 पासून मेगा ई – ऑक्शन करणार आहे. ज्यामध्ये देशभरातील अनेक शहरातील मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. जर तुम्हाला एखादे दुकान किंवा घर विकत घ्यायचे असेल तर ही मोठी संधी आहे. एस बी आय सोबत मिळून तुम्ही एक चांगली प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तसेच ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला एस बी आय स्वतः कर्ज देऊ शकते.

कशी कराल नोंदणी ? –

SBI च्या लिलावात सामील होण्याची आज शेवटची संधी आहे. कमीत कमी माहिती देऊन देखील तुम्ही याबाबतची नोंदणी करू शकता. बोली लावण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही माहिती देऊन नोंदणी करावी लागेल.

– सगळ्यात आधी http://sbi.auctiontiger.net किंवा www.bankeauctions.com या वेबसाईटला भेट द्या.
– यामध्ये रजिस्ट्रेशन हा पर्याय असेल त्यावर जा.
– यामध्ये मागितलेली महत्वाची माहिती भरा.
– करार आणि पॉलिसी बाबतची माहिती वाचून घ्या आणि रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.

या प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत उपलब्ध –

एसबीआय बँक या लिलावात अशा मालमत्तेचा लिलाव करणार आहे ज्या मालमत्तांचे कर्ज बँकेचे कर्जधारक फेडू शकलेले नाहीत. लिलावातून मिळालेल्या रकमेतून बँक आपल्या कर्जाच्या रकमेची वसुली करणार आहे.

फोन करून मिळवू शकता माहिती –

लिलावात सामील होण्यासाठी नोंदणी केल्यानंतर अधिक माहितीसाठी तुम्ही +91-79-61200554/ 587/ 594/ 598/ 559 फोन नंबर किंवा 09265562821, 09265562818, 09374519754 या मोबाइल नंबर वर संपर्क करू शकता. तसेच या व्यतिरिक्त [email protected] या इमेलच्या माध्यमातून आपल्या शंकेचे निरसन करू शकता.

Visit : Policenama.com