फायद्याची गोष्ट ! SBI च्या ‘या’ स्कीममधून दरमहा निश्चित होईल ‘कमाई’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदार असो की व्यवसाय करणारा व्यापारी असो, सर्वजण जास्त उत्पन्नासाठी प्रयत्न करत असतात. बँक वेळोवेळी अशा योजनांची घोषणाही करत असते. भारतीय स्टेट बँक एक अशीच योजना आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. बँक एन्युटी डिपॉजिट स्कीम अंतर्गत जमा रक्कमेवर एक निश्चित मासिक रक्कम देते. एसबीआयच्या या स्कीम अंतर्गत डिपॉजिटर्सला दर महिन्याला एक फिक्स्ड इन्कम मिळते. यासाठी त्यांना एकदाच बँकेत ठराविक रक्कम डिपॉजिट करावी लागते. एसबीआयची ही खास स्कीम त्या लोकांसाठी आहे, ज्यांना आपल्या सेव्हिंगच्या मदतीने दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळवायची आहे. आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत.

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या स्कीममध्ये डिपॉजिटर्सला प्रत्येक महिन्याला इक्वेटेड मंथली इन्कम (ईएमआय) म्हणजे ठरलेली रक्कम दिली जाते. यामध्ये प्रिन्सिपल अमाउन्टसह व्याजसुद्धा असते. अशाप्रकारे खातेधारकाला त्याच्या डिपॉजिटसह व्याजसुद्धा मिळते. यामध्ये डिपॉजिट जमा केल्यानंतर पुढील महिन्यापासून बँक व्याज देण्यास सुरूवात करते. समजा या स्कीमअंतर्गत 28 फेब्रुवारीला डिपॉजिट जमा केले असेल तर त्यावर तुम्हाला 27 मार्चपासून डिपॉजिट मिळणे सुरू होईल.

एसबीआयच्या एन्युटी डिपॉजिट स्कीमअंतर्गत कमाल डिपॉजिटची मर्यादा नाही. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला किमान 25 हजार रुपये या स्कीम अंतर्गत डिपॉजिट करणे अनिवार्य आहे.

कालावधी आणि व्याजदर

एसबीआय एन्युटी डिपॉजिट स्कीममध्ये ग्राहकांना अनेक मॅच्युरिटी पीरियडचा पर्याय मिळतो. या स्कीमवर मिळणारे व्याज फिक्स्ड किंवा टर्म डिपॉजिट एवढेच असते. सोबतच, हे यावर अवलंबून आहे की, या स्कीमसाठी डिपॉजिटर कोणता कालावधी निवडतो. नुकत्याच रिवाईज्ड व्याज दरानंतर, 1 ते 10 वर्षासाठी मॅच्युअर होणार्‍या एफडीवर ही बँक 6 टक्के दराने व्याज देते. 36 महीने, 60 महीने, 84 महीने किंवा 120 महिन्यासाठी एसबीआय एन्युटी डिपॉजिट स्कीमवर 6 टक्के दराने व्याज मिळेल.

कालावधी : डिपॉजिटर्सकडे पर्याय असतो की, तो 3 ते 5 वर्ष, 7 वर्ष आणि 10 वर्षांच्या पर्यायापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतो.

प्रीमॅच्युअर पेमेन्ट : एसबीआयच्या वेबसाइटनुसार, एसबीआय एन्युटी डिपॉजिट स्कीममध्ये प्रीमॅच्युरिटी पेमन्ट केवळ डिपॉजिटरच्या मृत्यूनंतर मिळू शकते.

इतर सुविधा : या स्कीम अंतर्गत डिपॉजिटर्सला नॉमिनेशनची सुविधा मिळते. डिपॉजिटर म्हणून तुम्हाला ओव्हरड्राफ्ट किंवा कर्जाची सुविधा सुद्धा मिळते. कर्जाची रक्कम डिपॉजिटच्या रक्कमेच्या 75 टक्केपर्यात असू शकते.