SBI ची लयभारी सुविधा, आता ATM मधून काढता येणार FD तले पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुंतवणुकीसाठी बँकांमध्ये फिक्स डिपॉजिट (FD) हा पर्याय सर्रास वापरला जातो. पण बँकांच्या वेळात जाणं आणि FD करणे, ती मोडणे पैसे काढून आणणे ही सर्व प्रक्रिया तितकीच वेळखाऊ आहे. म्हणूनच देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एसबीआय कडून ग्राहकांसाठी खूप मोठी सुविधा सुरु करण्यात आली आहे. जेणेकरून आपल्या FD मधील १००० रुपयांपेक्षा जादाची रक्कम एटीएमच्या माध्यमातवून काढता येणे शक्य होणार आहे.

SBI मल्‍टी ऑप्‍शन डिपॉजिट (MOD) च्या नावे एक FD ची सुविधा देते. पण SBI मल्‍टी ऑप्‍शन डिपॉजिट (MOD) मध्ये किमान मासिक ठरावीक पैसे असणे बंधनकारक आहे. या सुविधेचा वापर करून FD वरील रक्कम एटीम द्वारे सहजरित्या काढता येणार आहे.

मल्‍टी ऑप्‍शन डिपॉजिट (MOD) म्हणजे नक्की काय ? काय आहेत फायदे

— हे एक प्रकारचे टर्म डिपॉझिट असते. यामध्ये ग्राहकाचं बचत खातं हे चालू खात्याशी जोडलं जातं.
— जर आपल्याला चालू खात्यातून पैसे काढायचे आहेत. पण चालू खात्यात पैसे नसल्यास एमओडीमधून काढता येणार आहेत.
— मुदत ठेवी (FD) वर जेवढं व्याज मिळतं, तेवढंच व्याज एमओडीवर दिलं जातं.
— एमओडीमधून पैसे काढल्यानंतर उर्वरित रकमेवर व्याज मिळत राहतं.
— ग्राहकाला कर्ज आणि नॉमिनी लावण्याची सुविधाही पुरवली जाते.

कसे उघडाल मल्‍टी ऑप्‍शन डिपॉजिट (MOD)

— यासाठी आपल्याला खात्यात किमान १० हजार रुपये ठेवणे बंधनकारक आहे.
— त्यानंतर या खात्यात १ हजार आणि त्याहून अधिक पैसे जमा करता येतात. यात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याची कोणतीही          मर्यादा नाही.
— यात आपल्याला खातं १ वर्षापासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी उघडता येतं. यात मुदत पूर्वीही MOD मोडता येते.