तर … SBI ची नेट बँकिंग सेवा होणार बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा आता नवे फर्मान सोडले आहे.  तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार आहात आणि इंटरनेट बँकिग वापरता तर १ डिसेंबरपर्यंत आपला मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्या, अन्यथा तुम्हाला नेट बँकिंग सेवा वापरता येणार नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a508a381-ced6-11e8-8d59-c990fb17f363′]

बँकेने ‘ऑनलाइनसेबी’ या आपल्या संकेसस्थळावर ग्राहकांना माहिती दिली आहे की जर तुम्ही १ डिसेंबर २०१८ पर्यत तुमच्या SBI खात्याशी तुमचा मोबाइल क्रमांक जोडला नाही तर १ डिसेंबर २०१८ नंतर तुमची इंटरनेट बँकिंग सुविधा रद्द होईल.

आपल्या ग्राहकांना एसएमएसेस आणि इमेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर करायला सांगा, असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६ जुलै २०१७ रोजी एका निवदनाद्वारे बँकांना दिले होते.

पुन्हा उफाळून आले सिद्धू यांचे पाकिस्तान प्रेम…..

SBI खातेदारांना झटका, ATM मधून काढता येणार ‘इतकेच’ पैसे 

स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. एसबीआयच्या एटीएममधून आता दिवसाला फक्त  २० हजार रूपये काढता येणार आहे. डिजीटल व्यवहारांना चालणा देण्यासाठी एसबीआयने ४० हजार असणारी मर्यादा कमी करून २० हजार केली आहे. एसबीआय डेबिट कार्डच्या क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डधारकांसाठी असणार आहे.

एटीएमच्या माध्यमांतून होत असलेल्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि डिजीटल व्यवहारांना चालना मिळावा यासाठी पाऊल उचलल्याचे एसबीआयने सांगितले आहे. आगामी महिने सण-उत्सवांचे आहेत. या महिन्यात लोक आधीकाधिक एटीएमचा वापर करतात. आणि फसवणुकीचे शिकार होतात. अशा घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एसबीआयने स्पष्ट केलेय.

[amazon_link asins=’B01M0JSAFU,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’47fd8e7b-ced7-11e8-a6dd-9f62811a1f8e’]

सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असलं तरी देशात कॅशची मागणी वाढत आहे. ज्या ग्राहकांना जास्त पैशांची गरज असेल, त्यांनी जास्त मर्यादा असलेले डेबिट कार्ड घ्यावेत, असा सल्ला पी. के. गुप्ता यांनी दिला आहे. खात्यात जास्तीत जास्त किमान रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना अधिक मर्यादेचं डेबिट कार्ड दिलं जातं.