खुशखबर ! SBI नं सुरू केली खास सुविधा, ATM मधून कितीही वेळा पैसे काढा, लागणार नाही कुठलाही चार्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सर्व लोक पैसे काढण्यासाठी बँकेच्या एटीएमचा वापर करतात. मात्र बँकांनीही एटीएम व्यवहारांची संख्या मर्यादित केली आहे. जर ग्राहकांनी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर त्यांना त्यावर शुल्क भरावे लागते. हे शुल्क टाळण्यासाठी एसबीआयने आपल्या ग्राहकांना पैसे काढण्याचा एक नवीन मार्ग सुचविला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक कार्डशिवायही योनो सुविधेद्वारे एटीएममधून पैसे काढू शकतात, त्यांना एटीएम व्यवहारासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असे काढा योनो अ‍ॅपमधून पैसे –
एसबीआय योनो अ‍ॅपमधून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योनो अ‍ॅप डाऊनलोड करा.डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट बँकिंगचे यूजरनेम आणि पासवर्ड टाकून अकाऊंड तयार करावे. यानंतर नेटबॅकिंग यूजर आयडी व पासवर्ड टाका. यूजर आईडी और पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा लॉगिन वर क्लिक करा.

यांनतर एसबीआयचा योनो डॅशबोर्ड दिसेल, त्यावर खात्यातील सर्व माहिती मिळेल. आता कार्डशिवाय रोख रक्कम काढण्यासाठी वेबसाइटच्या ‘My Request Section वर स्क्रोल करा. YONO Pay, YONO Cash, Bill Pay, Products, Shop, Book & Order असे 6 पर्याय असतील. यापैकी तुम्हाला YONO Cash टॅबवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला दैनंदिन व्यवहार मर्यादेविषयी माहिती मिळेल.

एकाच व्यवहारात तुम्ही 500 रुपयांमधून 10,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. तुम्ही योनोमार्फत एसबीआय एटीएममधून जास्तीत जास्त 20,000 रुपये काढू शकता.

हा व्यवहार डेबिट कार्डशिवाय किंवा योनो अ‍ॅपशिवाय देखील केला जाऊ शकतो. योनो वेबसाइटद्वारे व्यवहारासाठी 6-अंकी योनो रोख पिन टाकून करुन रोख पैसे काढण्याची प्रक्रिया सुरु करा. या सेवेची दोन प्रकारे पुष्टी केली गेली आहे, प्रथम 6-अंकी रोख पिन, जो आपल्याला वेबसाइटवर तयार करावा लागेल. दुसरे म्हणजे, आपल्या मोबाइल नंबरवर आपल्याला एसएमएसद्वारे 6-अंकी संदर्भ क्रमांक मिळेल.

visit : policenama.com 

You might also like