SBI नं सुरू केली खास सुविधा ! ATM मधून कितीही वेळा पैसे काढा, नाही लागणार कोणताही ‘चार्ज’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – आजकाल लोक बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर जास्त प्रमाणात करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, आता बँकांनीही एटीएम व्यवहारांची संख्या मर्यादित केली आहे. जर ग्राहकांनी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर त्यांना त्यावर शुल्क भरावे लागेल. हे शुल्क टाळण्यासाठी एसबीआयने आपल्या ग्राहकांना पैसे परत काढण्याचा एक नवीन मार्ग सुचविला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया खातेधारक कार्डशिवायही योनो सुविधेद्वारे एटीएममधून पैसे काढू शकतात, त्यांना एटीएम व्यवहारासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.

योनो अ‍ॅपमधून पैसे कसे काढायचे
>> एसबीआय योनो अ‍ॅपमधून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योनो अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर नेटबॅकिंग यूजर आयडी व पासवर्ड भरावा लागेल. सक्रिय युजर्सने आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर पुन्हा लॉगिन वर क्लिक करणे गरजेचे आहे.

>> आता तुम्हाला एसबीआय योनो डॅशबोर्ड दिसेल, तुम्हाला खात्यातील सर्व माहिती मिळेल. आता कार्डशिवाय रोख रक्कम काढण्यासाठी वेबसाइटच्या ‘माय डिव्हाईस’ सेक्शनमध्ये स्क्रोल करा. योनो पे, योनो कॅश, बिल पे, प्रॉडक्ट्स, शॉप, बुक अँड ऑर्डर असे 6 पर्याय असतील. यावरून आपल्याला योनो कॅश टॅबवर क्लिक करावे लागेल.

>> येथे तुम्हाला दैनंदिन व्यवहार मर्यादेविषयी माहिती मिळेल. व्यवहारामध्ये तुम्ही 500 ते 10,000 रुपये काढू शकता. तुम्ही योनोमार्फत एसबीआय एटीएममधून जास्तीत जास्त 20,000 रुपये काढू शकता.

>> हा व्यवहार डेबिट कार्डशिवाय किंवा योनो अ‍ॅपशिवाय देखील होऊ शकतो. व्यवहारासाठी 6-अंकी YONO रोख पिन प्रविष्ट करुन योनो वेबसाइटद्वारे रोख पैसे काढण्याच्या प्रोसेसला सुरु करा.

>> या सेवेची दोन प्रकारे पुष्टी केली गेली आहे, प्रथम 6 अंकी रोख पिन, जो आपल्याला वेबसाइटवर बनवावा लागेल. दुसरे म्हणजे, आपल्या मोबाइल नंबरवर आपल्याला एसएमएसद्वारे 6-अंकी रेफ्रंस क्रमांक मिळेल.