SBI मध्ये उघडा मुलांसाठी ‘खास’ अकाऊंट, मिनिमम बॅलन्सची ‘कटकट’ तर नाहीच अन् ATM वर त्यांचा फोटो ‘प्रिन्ट’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला तुमच्या मुलांचे बँक खाते उघडायचे असेल तर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय तुम्हाला ही संधी देत आहे. या खात्यामध्ये कमीतकमी शुल्क ठेवण्याचे बंधन देखील नसून तुमच्या मुलांचा फोटो असलेलं एटीएम कार्ड देखील मिळणार आहे.
जाणून घ्या या खात्याबद्दल
एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘पहला कदम’ आणि ‘पहली उड़ान’ या योजनेंतर्गत अल्पवयीन मुलांचे खाते उघडले जाऊ शकते. यामाध्यमातून तुम्ही मुलांसाठी मोठी रक्कम देखील साठवू शकता. त्याचबरोबर मुलांना पैश्याचे महत्व देखील समजावून सांगता येते.
अशापद्धतीने छापला जातो एटीएमकार्डवर फोटो
या योजनांमध्ये बँक 5000 रुपये काढण्याची आणि त्याची खरेदी करण्याची परवानगी देते. त्याचबरोबर मुलांचा फोटो असलेले एटीएम कार्डदेखील बँक देते. मात्र हे कार्ड मुलांच्या नावे न देता त्यांच्या पालकांच्या नावे देते.
यासंदर्भातील पाच महत्वाच्या गोष्टी
योग्यता:
यामध्ये कोणत्याही अल्पवयीन मुलाला खाते खोलता येत असून आपल्या आईवडिलांच्या नावासह ते संयुक्त खाते खोलू शकतात. 10 वर्षांच्या पुढील मुलांना हे खाते खोलण्यास परवानगी असून ज्याच्या नावे हे खाते खोलण्यात आले आहे केवळ तोच याचे संचालन करू शकतो.
जास्तीतजास्त रक्कम :
यामध्ये तुम्ही जास्तीतजास्त 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवू शकता.
इंटरनेट बँकिंग :
या दोन योजनांच्या माध्यमातून प्रतिदिवस तुम्ही 5000 रुपये काढू शकता. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये इंटरनेट बँकिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
चेक बुक सुविधा:
या योजनेमध्ये खाते उघडल्यास तुम्हाला 10 चेक असणारे चेकबुक देखील मिळणार आहे.
एटीएम कम डेबिट कार्ड:
पहला कदम आणि पहली उड़ान या योजनेमध्ये एटीएम कार्डची देखील सुविधा मिळणार आहे. यामध्ये मुलाचा फोटो या कार्डवर असणार आहे. या कार्डमधून पैसे काढण्याची वैधता ही 5000 रुपये असून या खात्यावर 4 टक्के व्याजदर देखील मिळते. त्याचबरोबर यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम कार्ड, चेकबुक यांसारख्या सुविधा देखील मिळतात.
Visit : Policenama.com
- मन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या
- सौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का ? जाणून घ्या
- कामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा
- आनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा
- कामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- फिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा !