खुशखबर ! उद्यापासून (१ मे) SBI च्या व्याजदरात बदल, कर्ज होणार स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियात उद्यापासून म्हणजेच (१ मे ) पासून मुदत ठेवी आणि कर्जावरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडले जाणार आहेत. याचा परिणाम बँकेच्या व्याज दरावर होणार आहे. १ मे पासून म्हणजेच उद्यापासून कर्जाचा दर स्वस्त करण्यात येणार आहे.

एसबीआयने केलेल्या घोषणेनुसार, रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार बदलेल्या दरांचा फायदा ग्राहकांना लगेच देण्याच्या उद्देशाने बचत ठेवी आणि कमी कालावधीकरिता घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला रेपो रेटशी संलग्न करण्याचा निर्णय मे २०१९ पासून लागू करण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपोदरात ०.२५ टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर ६.२५ टक्क्यांवरून कमी होत ६ टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत आहे.

त्यामुळे आता SBI च्या या निर्णयामुळं कर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो. परंतु याचा फायदा एसबीआयच्या फक्त त्या खातेदारांना लागू होणार आहे, ज्यांच्या खात्यात एक लाखाहून अधिक रक्कम आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like