SBI नं सुरू केली नवी स्कीम ! जमीन नसलेल्या तसेच लहान शेतकर्‍यांना बँक शेतीसाठी देतेय तब्बल 85 % कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही शहरातील धावपळीच्या आयुष्याला कंटाळला असाल. जर तुम्हाला गावात शेती करायची असेल तर Land purchase scheme तुमच्यासाठी अधिक चांगली आहे. या योजनेमुळे तुम्हाला शेतीयोग्य जमीन मिळेल. वास्तविक ज्या लोकांना शेती करायची आहे पण जमीन नाही. त्यांची जमिनीची चिंता दूर करण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय जमीन खरेदी योजना) लँड परचेस स्कीम (एलपीएस) अधिक चांगली आहे. यामध्ये तुम्हाला केवळ १५ टक्के रक्कम द्यावी लागेल, उर्वरित ८५ टक्के तुम्हाला कर्ज मिळेल. यामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला ७ ते १० वर्षांचा कालावधी दिला जातो. कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची मालकी मिळेल.

योजनेचे उद्दिष्ट
एसबीआयच्या जमीन खरेदी योजनेचे (एलपीएस) उद्दीष्ट म्हणजे छोट्या शेतकर्‍यांना जमीन खरेदी करण्यात मदत करणे. याशिवाय अशा लोकांना जमीन उपलब्ध करुन दिली जाते, ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही. जो कोणीही अर्ज करेल, त्याच्याकडे कोणतेही कर्ज थकबाकी असू नये.

कोण करू शकते अर्ज?
अडीच एकरपेक्षा कमी सिंचन जमीन असलेले शेतकरी या एलपीएस अंतर्गत अर्ज करू शकतात. तसेच ज्यांच्याकडे जमीन नाही ते देखील अर्ज करू शकतात. जे लोक अर्ज करत आहेत, त्यांच्याकडे कर्ज परतफेड करण्याचा अधिक चांगला रेकॉर्ड असावा.

योजनेचे फायदे
या योजनेत एकूण किंमतीच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्हाला केवळ १५ टक्के भरणे आवश्यक आहे. जमीन बँकेच्या नावे राहील. नंतर ती तुमच्या नावे होईल. जमीन खरेदी योजनेत तुम्हाला १ ते २ वर्षे विनामूल्य वेळही मिळतो. यावेळी तुम्ही तुमची जमीन शेती योग्य करू शकता. जर जमीन आधीच विकसित झाली असेल, तर एसबीआय तुम्हाला एक वर्षाची मोफत मुदत देते. ही मुदत संपल्यानंतर तुम्हाला सहामाही हप्ता भरावा लागेल.