खुशखबर ! SBI ची ‘बंपर’ ऑफर, ‘ही’ कार बुक केल्यानंतर ‘सॅन्ट्रो’ जिंकण्याची संधी ; जाणून घ्या बुकिंग प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठ्या बँकेने SBI ने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. यासाठी तुम्हाला SBI चे YONO अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल आणि जर तुम्ही YONO वरुन हुंडाई Venue हा कार बुक केली तर तुम्हाला हुंडाई Sentro कार जिंकण्याची संधी मिळेल. म्हणजे एकावर एक फ्री. एवढेच नाही तर तुम्हाला एक सर्वोत्तम फायदेशीर व्याज दरात वाहन कर्ज बँकेकडून देण्यात येईल. ही ऑफर ३० जून २०१९ पर्यंत वैध आहे. म्हणजेच आता फक्त ३ दिवस बाकी आहेत. त्यामुळे याचा पुढील ३ दिवसात यांचा लाभ घेऊ शकतात. YONO हे एसबीआयचे डिजिटल अ‍ॅप आहे. यातून ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात.

अशी करा बुकिंग
– सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये SBI चे YONO अ‍ॅप डाऊनलोड करा.
– त्यानंतर तुम्हा अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
– तुम्ही जर SBI चे इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर, तुमचा यूजर नेम, पासवर्ड आणि रेफरल कोड त्यात      टाकून सबमिट करा.
– जर इंटरनेट बँकिंग नसेल तर ATM कार्डची डिटेल तुम्ही त्यात टाकू शकतात.
– जर ATM कार्ड देखील नसेल तर संबंधित ब्रान्चमध्ये जाऊन YONO अ‍ॅप चा लाभ घेऊ शकतात.
– YONO डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही हुंडाई Venue बुक करु शकतात.