SBI एकदम ‘फ्री’ देतंय ‘या’ 6 सुविधा, घरबसल्या ‘मिस्ड’ कॉल दिल्यानंतर होतील बँकेतील सर्व कामे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देत असते. एसबीआय आपल्या ग्राहकांना काही सेवा विनामूल्यही देत असते. आपण या सुविधांचा फायदा घरबसल्या देखील घेऊ शकता. तसेच बँकेशी संबंधित कामकाज चुटकीसरशी सोडवू शकतात.

मिस्ड कॉल देऊन बँकेसंबंधित सर्व कामे हाताळू शकतात
एसबीआयच्या ग्राहकांसाठी एसबीआय क्विक मिस्ड कॉल बँकिंग सर्व्हिस (SBI Quick Missed Call Banking Service) उपलब्ध आहे. म्हणजेच एसबीआय ग्राहक घरबसल्या केवळ एका मिस कॉलद्वारे बँकिंगशी संबंधित सर्व कामे हाताळू शकतात.

चला जाणून घेऊया सर्व सुविधांबाबत –

१) शिल्लक रकमेची माहिती
आपल्याला आपली बँकेतील शिल्लक रक्कम जाणून घ्यायची असेल तर आपल्याला ०९२२३७६६६६६ वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय तुम्ही या क्रमांकावर ‘BAL’ एसएमएस देखील पाठवू शकता.

२) मिनी स्टेटमेंट मिळविण्यासाठी
मिनी स्टेटमेंट मिळवण्यासाठी आपणास ०९२२३८६६६६६ वर एक मिस कॉल द्यावा लागेल. या व्यतिरिक्त आपण ०९२२३८६६६६६ वर ‘MSTMT’ लिहून एसएमएस देखील पाठवू शकता. याद्वारे आपण शेवटच्या पाच व्यवहारांमध्ये मिनी स्टेटमेंट देखील मिळवू शकतात.

३) चेक बुकसाठी अर्ज
नवीन चेक बुक मिळवण्यासाठी अर्ज करण्याकरिता आपणास ०९२२३५८८८८८ वर मिस्ड कॉल करावा लागेल किंवा या क्रमांकावर ‘CHQREQ’ असा एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर ग्राहकांना पुष्टी करणासाठी सहा अंकी क्रमांकासह बँकेकडून एसएमएस मिळेल. आता खातेधारकास ०९२२३५८८८८८ वर ‘CHQREQ <स्पेस> Y <स्पेस> सहा अंकी क्रमांक’ एसएमएस करावा लागणार आहे.

४) ई-स्टेटमेंटसाठी
आपल्या नोंदणीकृत ईमेलवर मागील सहा महिन्यांचे स्टेटमेंट मिळविण्यासाठी, आपल्याला ०९२२३५८८८८८ वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल किंवा ‘ESTMT <स्पेस> अकाउंट नंबर <स्पेस> चार अंकी कोड’ पाठवावा लागेल. सुविधानुसार आपल्या ईमेल वर पासवर्ड सुरक्षित पीडीएफ फाईल पाठविली जाईल.

५) एजुकेशन लोन व्याज सर्टिफिकेट साठी
एजुकेशन लोन व्याज सर्टिफिकेट साठी ग्राहकांना ०९२२३५८८८८८ वर मिस्ड कॉल करावा लागणार आहे. ‘ELS<स्पेस>अकाउंट नंबर<स्पेस> <४ डिजिट कोड>’ असा एसएमएस पाठवावा लागणार आहे.

६) होम लोन व्याज सर्टिफिकेट
होम लोन व्याज सर्टिफिकेटसाठी ग्राहकांना ०९२२३५८८८८८ वर मिस्ड कॉल करावा लागणार आहे. ‘HLI<स्पेस>अकाउंट नंबर<स्पेस> <४ डिजिट कोड>’ असा एसएमएस पाठवावा लागणार आहे.

सुविधेसाठी करावी लागणार नोंदणी
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नोंदणी करावी लागेल. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून ०९२२३४८८८८८ वर ‘REG <स्पेस> बँक खाते क्रमांक’ असा एसएमएस पाठवावा लागेल, त्यानंतर ग्राहकाला एक पुष्टीकरणाचा एसएमएस मिळेल. पुष्टीकरणानंतर सेवेचा लाभ आपल्याला घेता येणार आहे.

मोबाइल नंबर बँक खात्यात नोंदवावा लागेल
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बँक खात्यासह नोंदवावा लागेल. आपण आपला मोबाइल नंबर बदलल्यास आपला नवीन नंबर देखील अपडेट करावा लागेल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/