SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Offering CA Service News | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शनिवारी इन्कम टॅक्स डेच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांना मोफत टॅक्स रिटर्न भरण्याची संधी (SBI Offering CA Service) दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून एसबीआने ही माहिती दिली.

एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले, टॅक्सपेयर्सने YONO अ‍ॅपवर Tax2win च्या मदतीने मोफत रिटर्न फाइल करावे. तसेच, तुम्ही सीएच्या सर्व्हिसचा सुद्धा लाभ घेऊ शकता. मात्र, या सर्व्हिससाठी फी भरावी लागेल आणि ती 199 रुपयांपासून सुरू होईल. अशी सीएची किमान फी 549 रुपये आहे, परंतु आज स्पेशल डिस्काऊंट दिले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या खास ऑफरचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता ते जाणून घेवूयात…

असा फाइल करा योनो अ‍ॅपद्वारे आयटीआर

सर्वप्रथम योनो अ‍ॅपमध्ये लॉगइन करा.

यानंतर शॉप अँड ऑर्डरवर जा.

नंतर टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये जा.

यानंतर तुम्हाला Tax2Win दिसेल. येथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज लँड होईल.

येथे फाईल आयटीआर नाऊचे ऑपशन येते.

येथे File it yourself आणि Get a personal eCA चे ऑपशन येते.

हा टॅक्सपेयर्ससाठी ई-फायलिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने टॅक्स रिटर्न फाईल करणे खुप सोपे होते.

टॅक्स टू विनसोबत केला करार
एसबीआयने टॅक्स टू विनसोबत करार केला आहे. बँकेच्या योनो अ‍ॅपवर सुद्धा याची सुविधा दिली आहे.

Web Title :- SBI Offering CA Service | sbi offering ca service just 199 rupees on income tax day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)