
कामाची गोष्ट ! SBI च्या Debit card वर मिळते EMI ची सुविधा, जाणून घ्या कसा घेणार फायदा
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आजकाल EMI ची सुविधा अनेक ठिकाणी दिली जाते. तुम्ही शॉपिंग करा आणि ते EMI मध्ये कन्व्हर्ट करा. याचे अनेक फायदे आहेत. एकतर एकाच टप्प्यात रक्कम द्यावी लागत नाही. काही वेळा तर तुम्हाला त्याचे इंटरेस्टही (व्याज) लागत नाही. मात्र, EMI ची ही सुविधा सामान्यपणे क्रेडिट कार्ड होल्डरना मिळते. पण क्रेडिट कार्ड सर्वांकडेच असते असे नाही. त्यानंतर आता SBI ने आपल्या Debit Card वर EMI ची सुविधा दिली आहे.
भारतीय स्टेट बँक (SBI) ने बँकेच्या डेबिट कार्डच्या माध्यमातून टीव्ही, एसी, फ्रीज यांसारखे होम अप्लायन्सेस खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्हाला EMI चा पर्यायही मिळणार आहे. तसेच तुम्ही कोणत्याही दुकानात जाऊन POS मशिनच्या माध्यमातून पेमेंट केल्यानंतर ते EMI मध्ये कन्व्हर्ट करू शकता. असे केल्यास तुमच्या खात्यातून मोठी रक्कम वजा होत नाही. तुमच्या सवडीनुसार EMI चा आकडा निवडू शकता. जर Amazon, Flipkart च्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला SBI Debit Card ने पेमेंट करताना EMI मध्ये कन्व्हर्ट करू शकता.
ही ऑफर कोणासाठी?
SBI नुसार, ही सुविधा प्री-अप्रूव्हड बेस्ड आहे. म्हणजे SBI च्या सर्व ग्राहकांना ही सुविधा मिळणार नाही. फक्त काही ठराविक ग्राहकांनाच ही सुविधा मिळणार आहे. बाकीच्या ग्राहकांना थेट डेबिट कार्डच्या माध्यमातून पूर्ण पेमेंट करावे लागणार आहे. त्यामुळे शॉपिंग करताना तुमच्या डेबिट कार्डवर EMI ची सुविधा आहे की नाही हे तपासा.
असे जाणून घ्या ऑफर तुमच्यासाठी आहे की नाही…
तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 567676 वर DCEMI लिहून मेसेज करावा. त्यानंतर आलेल्या रिप्लायवरून तुम्हाला समजू शकेल की ही ऑफर तुमच्यासाठी आहे की नाही.
EMI चा फायदा
जर तुमच्या SBI डेबिट कार्डवर EMI ची सुविधा असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत शॉपिंग करता येऊ शकते. याचे पेमेंट तुम्ही 6,9,12 किंवा 18 महिन्यांच्या EMI वरून करू शकता. EMI तुम्ही 2 वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला त्या MCLR वर 7.5 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारले जाणार आहे.