खुशखबर ! SBIच्या शाखेत न जाता घरबसल्या जमा करा पैसे, कुठलाही चार्ज लागणार नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी अनेक विशेष सुविधा आणल्या आहेत. यामध्ये SBI आपल्या विशेष ग्राहकांना ‘डोर स्टेप बँकिंग’ची सुविधा देणार आहे. ही विशेष सेवा ७० वर्षांपेक्षा आधिक वय असलेल्या वयस्कर व्यक्तींना देण्यात येणार आहे. याच बरोबर या सेवेचा लाभ दिव्यांग, इनफर्म ग्राहक देखील घेऊ शकणार आहे. या अतंर्गत रक्कम घेऊन जाणे ते डिलिवरी सह (रक्कम घरी आणून देणे) अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार ही विशेष सेवा देण्यात येणार आहे.

यात SBI कडून विशेष ग्राहकांची सोय व्हावी, त्यांना बँकेत रांगेत उभे राहायला लागू नये यासाठी देण्यात येणार आहेत. बँकेकडून या विशेष ग्राहकांच्या वयाचा आणि आरोग्याचा विचार करुन ही सुविधा राबवण्यात येणार आहे.

काय आहेत या विशेष सुविधा

डोर स्टेप बँकिंगची सुविधा
या योजनेअंतर्गत ग्राहकांना या ६ सुविधा देण्यात येणार आहे. यात रक्कम बँकेत घेऊन जाणे आणि आणून देणे, चेकबुक घेऊन जाणे आणून देणे, ड्राफ्टची डिलिवरी करणे, डिपॉजिट बाबत सल्ला देणे, लाइफ सर्टिफिकेट पिकअप, इनकम टॅक्स साठीचा फाॅर्म १५ H पिकअप करणे अशा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

असा घ्या सेवेचा लाभ
या डोर स्टेप बँकिंग सेवेचा फायदा केवायसी झालेल्या खातेधारकांना मिळणार आहे, ज्याच्याकडे बँकेचा एक नोंदणीकृत वैध मोबाईल नंबर आहे. SBI च्या होम ब्रॉच पासून ५ किलोमीटर अंतरात खाते धारक राहत असावा. यात जाॅइंट अकाऊंट, लहान मुलांचे खाते आणि नॉन पर्सनल खातेधारकांसाठी या सुविधेच्या लाभ मिळणार नाही.

लाभार्थी ग्राहकांना या सेवेसाठी शुल्क द्यावे लागेल, जर फायनांशियल ट्रांजॅक्शन असेल तर त्यासाठी १०० रुपये प्रति ट्रांजॅक्शन शुल्क द्यावे लागेल. तर नॉनफायनांशियल ट्रांजॅक्शनसाठी ६० रुपये शुल्क द्यावे लागेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला होम ब्रांचमध्ये नोंदणी करावी लागेल आणि दिव्यांग असल्यास तसे प्रमाण पत्र सादर करावे लागेल.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like