SBI Online Transaction | ‘एसबीआय’ बँकेने केला मोठा बदल ! ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Online Transaction | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) कोट्यावधी ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. जर तुमचे एसबीआयमध्ये (SBI) खाते असेल, तर आजपासून म्हणजे 1 फेब्रुवारीपासून बँकेने मोठा बदल केला आहे. यानुसार, एसबीआयच्या (SBI) ग्राहकांना आता ऑनलाइन ट्रांजेक्शन (SBI Online Transaction) करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.

 

स्टेट बँक ऑफ इंडियाने आजपासून IMPS व्यवहारासाठी आणखी एक नवा स्लॅब जोडला आहे. याचा परिणाम थेट ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. बँकेने सर्व ग्राहकांना याची माहिती दिली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा स्लॅब 2 ते 5 लाखापर्यंतचा असणार आहे. आपण IMPS द्वारे 2 ते 5 लाख रुपयांचा व्यवहार केला, तर पैसे पाठवणाऱ्या ग्राहकाला 20 रुपये प्लस GST भरावा लागेल. (SBI Online Transaction)

 

IMPS सेवेच्या माध्यमाने ग्राहक ऑनलाइन पैसे पाठवू शकतात. या सेवेचा लाभ 24 तास आणि 7 ही दिवस घेता येतो. बँक शाखांमधून करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठी 1 हजार ते 10 हजार रुपयांदरम्यानच्या व्यवहारांवर 2 रुपये प्लस GST द्यावा लागणार आहे. तसेच 10 हजार ते 1 लाख रुपयापर्यंतच्या IMPS वर 4 रुपये प्लस GST आणि 1 लाख ते 2 लाख रुपयांच्या IMPS वर 12 रुपये प्लस GST द्यावी लागेल.

डिजिटल बँकिंगला (Digital Banking) प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी 2 लाख रुपयापर्यंतच्या IMPS व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क (Service Charge) आकारले जात नव्हते.
ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे आपण कुठेही पैसे पाठवू शकता.
ग्राहक IMPS, NEFT, RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करु शकतात. महत्त्वाचे म्हणजे NEFT आणि RTGS सुविधा वेळेनुसार उपलब्ध असेल.

 

RBI ने ऑक्टोबर महिन्यात IMPS व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. सरकारने अशा व्यवहारांची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली होती.
म्हणजेच तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपयापर्यंत व्यवहार करु शकाल. यापूर्वी ही मर्यादा दोन लाख रुपये होती.

 

एसबीआयने म्हटले की, डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, आता बँक इंटरनेट बँकिंग आणि YONO सह मोबाइल बँकिंगद्वारे
केलेल्या 5 लाख रुपयापर्यंतच्या ऑनलाइन IMPS व्यवहारांवर कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही.

 

 

Web Title :- SBI Online Transaction | Big news for millions of sbi customers big change made by the bank a blow to the pocket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 14,372 नवीन रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Station Platform Ticket | पुणेकरांना दिलासा ! प्लॅटफॉर्म तिकीट दर पुन्हा 50 रूपयांवरून 10 रूपये

 

Ajit Pawar | ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधून सापडणार नाही’, अजीत पवारांची टीका