खुशखबर ! SBI च्या ग्राहकांना १ ऑगस्टपासून ‘या’ सुविधा पूर्णपणे मोफत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने व्याजदर कमी करून आपल्या ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर ता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने आता पैश्यांच्या देवाण-घेवाण बाबतीत असणारी IMPS सेवा एक ऑगस्टपासून पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँक लवकरच NEFT आणि RTGS वर आकारण्यात येणारे शुल्क देखील रद्द करणार आहे. आरबीआयकडून या सुविधांवर सूट देण्यात आल्यानंतर एसबीआय देखील या सुविधा आपल्या ग्राहकांसाठी मोफत करणार आहे. ऑनलाईन रक्कम ट्रान्स्फर करताना तुम्हाला एनईएफटी, आरटीजीएस और आयएमपीएस या सुविधा देत असते. त्यामध्ये आता आयएमपीएस हि सुविधा मोफत करून लवकरच बाकीच्या दोन सुविधा देखील मोफत करण्याचा विचार करत आहे.

IMPS म्हणजे काय
इमिजिएट पेमेंट सर्विसेज म्हणजेच आयएमपीएस. या सेवेत तुम्ही मोबाईल ऍपद्वारे तात्काळ पैसे ट्रान्स्फर करू शकता. या सुविधेचा वापर करून तुम्ही मित्रांना किंवा नातेवाईकांना पैसे पाठवू शकता. यामुळे ग्राहकांना तात्काळ पैसे पाठवता येतात. याआधी या सेवेवर शुल्क घेतले जात असे. यापुढे ते घेतले जाणार नाही. या सेवेत तुम्ही दिवसातून कधीही पैसे ट्रान्स्फर करू शकता. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवले कि काही सेकंदात ते पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यावर जमा झालेले असतात. तुम्ही सुट्टीच्या दिवशी देखील या सुविधेचा वापर करू शकता.

आयएमपीएस सुविधेत पैसे ट्रान्स्फर करण्याची वेळ
१)आठवड्यातील २४ तास
२)कमीतकमी १ रुपया
३)जास्तीत जास्त २ लाख रुपये

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या