SBI ची वॉर्निंग : या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून सावध रहा अन्यथा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या खातेधारकांना एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

एसबीआयने आपल्या ग्राहकांना बँक खात्याच्या सुरक्षेबाबत जागरूक करण्यासाठी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये एसबीआयने आपल्या ग्राहकांना बँक खात्यातील व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडिया मेसेजपासून दूर राहण्याची सल्ला दिला आहे. एसबीआयच्या मते, हा मेसेज ग्राहकांना फसवून त्यांचे बँकिंग डिटेल्स मागण्याची शक्यता आहे. हा स्कॅम पहिल्यांदा ग्राहकाला ओटीपीची माहिती विचारतो आणि ग्राहकाचा विश्वास संपादन केल्यानंतर प्रत्यक्षात ओटीपी शेअर करायला सांगतो. एसबीआयने आपल्या ग्राहकांना व्हाट्सएप मेसेजसाठी ओटीपी शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.

हा असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज एका लिंकसह येतो त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युझर चुकून कोणत्याही धोकादायक अ‍ॅपवर क्लिक करण्याची शक्यता आहे. या अ‍ॅपच्या मदतीने हॅकर ओटीपी चोरू शकतो.