खुशखबर ! ‘ATM’च्या माध्यामातून ‘या’ ८ सुविधा मिळवा एकदम ‘फ्री’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – तुम्ही तुमच्या ATM चा वापर फक्त पैसे काढण्यासाठी किंवा बचत खात्यातील रक्कम पाहण्यासाठी करता. परंतू तुम्ही आता बँक एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक अशा सेवा देतात की तुम्हाला तासोतास बँकेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही बँकेत एफडी करणे, टॅक्स डिपॉजिड, मोबाईल रिचार्जसारखी अनेक कामे बँकेत न जाता करु शकतात.

१. फिक्स डिपॉजिटची सुविधा –
तुम्ही ATM च्या माध्यमातून फिक्स डिपॉजिट करु शकता. तुम्हाला फक्त मेन्यूत देण्यात आलेल्या स्टेप्सला फॉलो करायचे आहे. यात तुम्हाला डिपॉजिटचा कालावधी, रक्कम निवडल्यानंतर फन्फर्म करण्याचा पर्याय देखील दिसेल.

२. टॅक्स भरणे –
देशातील अनेक मोठ्या बँका इनकम टॅक्स भरण्याची सुविधा देतात. यात अ‍ॅडवान्स टॅक्स, सेल्फ एसेसमेंट टॅक्स आणि रेगुलर असेसमेंट टॅक्स भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी सुरुवातीला तुम्हाला वेबसाइटवरुन किंवा बँकेत जाऊन पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ATMच्या माध्यमातून तुम्ही कर भरु शकता. खात्यातून पैसे कापण्यात आल्यानंतर एटीएम तुम्हाला एक सीआयएन नंबर जारी करेल. त्यानंतर २४ तासानंतर तुम्ही बॅक वेबसाइटला विजिट करा, जेथून सीआयएन नंबरचा प्रयोग करुन चलनाची प्रिंट काढू शकता.

३. दुसऱ्या एटीएममध्ये भरा रोख-
अनेक मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनी कॅश डिपॉजिट मशीन लावले होते. एकाच वेळी तुम्ही ४९,९०० रुपये जमा करु शकता. या मशीनमुळे २०००, ५००, १०० आणि ५० च्या नोटा जमा करु शकता.

४. इंशुरेन्स पॉलिसीचे पैसे भरा –
LIC, HDFC आणि SBI लाइफ सारख्या बीमा कंपन्यानी बँकांबरोबर करार केला आहे. ज्यामुळे या कंपन्याचे ग्राहक ATM च्या माध्यमातून प्रीमियम भरु शकतील. यासाठी तुमचा पॉलिसी नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. एटीएमच्या बिल पे सेक्शनच्या वीमा कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर पॉलिसी नंबर एंटर करा त्यात तुमची जन्म तारीख, मोबाईल नंबर टाका. यानंतर प्रीमियम रक्कम टाका आणि कन्फर्म करा.

५. लोन साठी करा अप्लाय –
छोट्या रक्कमेच्या पर्सनल लोनसाठी तुम्ही ATM च्या माध्यमातून अप्लाय करु शकतात. यासाठी तुम्हाला फोन बँकिंग आणि बँक ब्रांच पर्यंत जाण्याची गरज नाही. अनेक खासगी बँका ATM च्या माध्यमातून ग्राहकांना प्री एप्रूव्ड पर्सनल लोन ऑफर करु शकतात. याला तुम्ही ATM च्या माध्यातून काढू शकतात. लोनच्या रक्कमेची गणना अ‍ॅडवान्स एनालिटिक्सच्या माध्यमतून होते. यासाठी ग्राहकाला ट्रांजेक्शन डिटेल, अकाऊंट बॅलन्स, सॅलरी ची रक्कम आणि क्रेडिड/ डेबिट कार्डच्या रिपेमेंटचा रेकॉर्ड पाहिला जातो.

६. कॅश ट्रांसफर –
जर तुम्ही नेट बँकिंगचा प्रयोग करत नसाल तर ATM च्या मदतीने आपल्या खात्यातून दुसऱ्या खात्यावर रक्कम ट्रांन्सफर करु शकतात. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन खात्याची नोंदणी करावी लागेल. एका वेळी तुम्ही एटीएममधून ४०,००० रुपये ट्रांसफर करु शकतात. एका दिवसाला तुम्ही अनेकदा ट्रांसफर करु शकतात.

७. भरा बिल –
टेलीफोन, वीज, गॅस यासारखे अनेक बिल एटीएमच्या माध्यातून भरु शकतात. असे असले तरी बिल भरण्यासाठी बँकेच्या वेबसाइटवर तुम्हाला नोदंणी करावी लागेल.

८. बुक कार रेल्वे तिकिट –
देशातील सर्वात मोठी बँक SBI रेल्वेच्या बिल्डिंग अंतर्गत जे एटीएम आहे ज्या आधारे तिकिट बुक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत तुम्ही आरक्षित रेल्वे तिकिट देखील बुक करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –