आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही ; ATM च करेल ‘ही’ ८ महत्वाची कामे..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल एटीएमचा वापर वाढला आहे. सोबत कॅश बाळगण्यापेक्षा नागरिक एटीएमच्या वापरला अधिक पसंती देऊ लागले आहेत . मात्र ‘एटीएम’ हे केवळ पैसे काढण्याचे मशीन राहिले नसून, त्यामुळे त्याचा अन्यत्र कारणांसाठी वापरदेखील वाढला आहे. ग्राहकांचा बँक शाखांमध्ये येणारा ओघ कमी करण्यासाठी बँकांनी विविध प्रकराच्या सुविधा आणि सेवा ‘एटीएम’मार्फत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता तासोनतास बँकेमध्ये उभं राहावं लागणार नाही. विविध प्रकारची बिले, कर, निधी हस्तांतर आदी सुविधांचा यात समावेश आहे.

एटीएमद्वारे करता येणारी महत्वाची कामे –

१) ४० हजार रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर –

तुम्ही नेटबँकिंग करत नसाल तर ATMच्या मदतीनं तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करू शकता. एका वेळी ATMमधून तुम्ही ४० हजार रुपयापर्यंत ट्रान्सफर करू शकता. एका दिवसात तुम्ही अनेक वेळा रक्कम ट्रान्सफर करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला आॅनलाइन किंवा ब्रँचमध्ये जाऊन त्या खात्यात रजिस्टर करावं लागेलं, ज्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करायची आहे.

२) पैसे जमा करणे –

मोठ्या सरकारी बँका आणि खासगी बँका यांनी एटीएममध्ये कॅश डिपाॅझिट मशीन ठेवली असून यात तुम्ही ४९,९०० रुपये जमा करू शकता. या मशीन्समध्ये २०००, ५००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटा जमा करता येतात.

३) कर्ज मिळवा –

कमी रकमेच्या पर्सनल लोनसाठी तुम्ही ATMमधून अप्लाय करू शकता. अनेक खासगी बँका ATM मधून आपल्या ग्राहकांना प्री अ‍ॅप्रुव्हड पर्सनल लोन देतात.हे कर्ज तुम्ही ATMमधून काढू शकता. कर्जाची रक्कम अ‍ॅडव्हान्स अ‍ॅनालिटिक्स पडताळून पाहतो. त्यासाठी ग्राहकांचे ट्रॅन्झॅक्शन डिटेल्स, अकाउंट बॅलन्स, पगाराची रक्कम, क्रेडिट,डेबिट कार्डाच्या रिपेमेंटचे डिटेल्स हे सगळ तपासलं जातं.

४) एटीएममधून विमा भरा –

LIC, HDFC लाइफ आणि SBI लाइफसारख्या विमा कंपनींनी बँकांसोबत करार केलाय. त्यानुसार या कंपन्यांचे विमा ग्राहत एटीएममधून विमा भरू शकतात. यासाठी तुम्हाला पाॅलिसी नंबर तयार ठेवावा लागेल. एटीएमच्या बिलावर सेक्शनमध्ये विमा कंपनीचं नाव सिलेक्ट करावं लागेल. यानंतर पाॅलिसी नंबर एंटर करावा लागेल. त्यानंतर जन्मतारीख आणि मोबाइल नंबर. मग प्रीमियमची रक्कम अ‍ॅड करा आणि कन्फर्म करा.

५) घरगुती बिले भरा –

टेलिफोन, वीज, गॅस किंवा दुसरी अनेक बिलं एटीएमद्वारे भरू शकता. याआधी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर स्वत: रजिस्टर करावं लागेल.

६) रेल्वेचं तिकीट बुक करा-

SBI एटीएमद्वारा तिकीट बुक करायची सेवा देते. यात तुम्ही लांब पल्ल्याच्या ट्रेन्सची तिकिटं बुक करू शकता.

७) विविध कर भरा –

देशातल्या अनेक मोठ्या बँका एटीएमद्वारे आयकर भरण्याची सुविधा देतायत. यात अ‍ॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट टॅक्स आणि रेग्युलर असेसमेंटनंतर दिला जाणारा कर यांचा समावेश आहे.ATM द्वारे आयकर भरायचा असेल तर तुमच्या बँकेच्या वेबसाइट किंवा शाखेत जाऊन या सुविधेसाठी रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर ATMच्या मदतीनं तुम्ही कर भरू शकता.

८) फिक्स्ड डिपाॅझिट करा –

तुम्ही ATMमधून फिक्स्ड डिपाॅझिट करू शकता. तुम्हाला मेन्यूमध्ये दिलेल्या स्टेप्सप्रमाणे जायचंय. त्यात तुम्हाला डिपाॅझिटचा काळ, रक्कम निवडल्यानंतर कन्फर्म करा.