SBI PO Recruitment 2021 | SBI मध्ये 2056 जागांसाठी बंपर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI PO Recruitment 2021 | भारतातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) भरती घेण्यात येत आहे. जे बॅकेत नोकरी करु इच्छित असणार आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी (SBI PO Recruitment 2021)अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीने करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे –
प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO Recruitment 2021)

शैक्षणिक पात्रता –

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता.

जे पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील या अटीचं पालन करून अर्ज करू शकतात.

जेव्हा त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, तोपर्यंत त्यांना 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांची पास झाल्याची ग्रॅज्युएशन डिग्री दाखवावी लागेल.

IDD प्रमाणपत्र असणाऱ्यांना याची खात्री करून घेणे आवश्यक आहे की त्यांचे IDD पास करण्याची तारीख 31 डिसेंबर 2021 किंवा त्यापूर्वीची आहे की नाही. चार्टड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटची पात्रता असणारे उमेदवारही याकरता अर्ज करू शकतात.

 

वयाची अट –

1 एप्रिल 2021 पर्यंत उमेदवाराचे वर 21 वर्षांपेक्षा कमी किंवा 30 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2000 नंतरचा आणि 2 एप्रिल 1991 पूर्वीचा असता कामा नये.

परिक्षेंच्या तारखा –

ऑनलाइन रजिस्ट्रेशन 5 ते 25 ऑक्टोबर

Online प्राथमिक परीक्षा – नोव्हेबंर/डिसेंबर 2021

ऑनलाइन मुख्य परीक्षा – डिसेंबर 2021

मुलाखत (मुलाखत आणि ग्रुप एक्सरसाइज) – फेब्रुवारी 2022 चा दुसरा/तिसरा आठवडा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्यासाठी – https://bank.sbi/careers अथवा https://www.sbi.co.in/careers

 

Web Title :- sbi po 2021 notification released for 2056 vacancies apply online at sbi co in for recruitment of probationary officers at state bank of india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp आणतंय Voice मेसेजसाठी अतिशय विशेष फीचर, यूजर्सला मिळेल नवीन ‘ऑपशन’; जाणून घ्या

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 2000 ऐवजी 4000 रुपये, परंतु यांना मिळणार नाही ‘लाभ’

Pune Crime | पुण्यात 28 वर्षीय महिला वकिल, त्यांच्या पतीवर कोयत्याने सपासप वार; भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या