SBI Quick | एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे सुद्धा चेक करू शकता SBI अकाऊंट बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Quick | जर तुमचे एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये अकाऊंट असेल तर अकाऊंट बॅलन्स जाणून घेण्यासाठी बँक ब्रँचमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या आणि विना इंटरनेट बॅलन्स चेक करू शकता. कारण, एसबीआय क्विक – मिस्ड कॉल बँकिंग (SBI Quick – MISSED CALL BANKING) सर्व्हिसद्वारे तुम्ही अनेक प्रकारची माहिती मिस्ड कॉल किंवा एसएमएस पाठवून प्राप्त करू शकता.
– एसबीआय क्विक सेवांसाठी आवश्यक वन टाइम रजिस्ट्रेशन
एसबीआय क्विक (SBI Quick) – मिस्ड कॉल बँकिंग सर्व्हिस अंतर्गत कोणतीही सेवा मिळवण्यासाठी सर्वप्रथम रजिस्टर करावे लागेल. यासाठी REG टाइप करा नंतर स्पेस देऊन अकाऊंट नंबर लिहा आणि 09223488888 वर एसएमएस पाठवा.
जसे की REG Account Number आणि पाठवा 09223488888 वर. एक लक्षात ठेवा की त्याच नंबरवरून हा मेसेज पाठवा, जो अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड असेल.
– टोल फ्री नंबरवरून असा चेक करा बॅलन्स
एसबीआयने टोल फ्री नंबर 09223766666 जारी केला आहे. बॅलन्स जाणून घेण्यासाठी या नंबरवर मिस्ड कॉल करा. यानंतर काही सेकंदातच पूर्ण माहिती एसएमएसद्वारे पाठवली जाईल.
– एसएमएसद्वारे जाणून घ्या बॅलन्स
बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून BAL टाइप करून 09223766666 वर एसएमएस पाठवा. यानंतर काही सेकंदात पूर्ण माहिती एसएमएसद्वारे पाठवली जाईल.
– एसएमएसद्वारे मिळवा मिनी स्टेटमेंट
एसबीआय अकाऊंटचे मिनी स्टेटमेंट पाहिजे असेल तर यासाठी MSTMT टाइप करून 09223866666 वर SMS पाठवा.
– एसएमएसद्वारे चेकबुक मागवा
एसबीआय चेकबुकसाठी अर्ज करायचा असेल तर CHQREQ टाइप करून 09223588888 वर एसएमएस पाठवा. (SBI Quick)
Web Title :- SBI Quick | how sbi account holders can check balance through missed call and sms
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
RSS On PM modi Meets Pope Francis | मोदी-पोप भेटीवर RSS ने म्हटले,-‘अशा भेटींमुळे आपल्या…’
Dhantrayodashi 2021 | यावेळी धनत्रयोदशीला केवळ 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या काय आहे पद्धत?
Parambir Singh | परमबीर सिंग बेल्जियममध्ये आहेत, काँग्रेस नेत्याचा दावा; केली ‘ही’ मागणी