SBI Rates Hike | स्टेट बँकेने वाढवला व्याजदर! आता महाग झाले कर्ज, द्यावा लागेल जास्त EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Rates Hike | भारतीय स्टेट बँकेने (State Bank of India – SBI) आपल्या आधार दरात 10 आधार अकांची (Base Rates Hike) वाढ केली आहे. एसबीआयच्या या पावलामुळे सध्याच्या कर्जदारांसाठी कर्ज थोडे महाग (Costlier Loan) होणार आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार बेस रेटमध्ये 10 बीपीएसची वाढ केली आहे. नवीन दर 15 डिसेंबर 2021 पासून प्रभावी झाले आहेत. यापूर्वी सप्टेंबरमध्ये बँकेने आधार दर 5 आधार अंकाने कमी करून 7.45 टक्के केला होता. (SBI Rates Hike)

 

भारतीय स्टेट बँकेने प्राईम लेंडिंग रेट (PLR) सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने पीएलआरमध्ये 2.5 टक्के मोठी वाढ करत तो 10 टक्क्यावरून 12.30 टक्के केला आहे. तसेच, बेस रेटमध्ये 10 बेसिक पॉईंट म्हणजे 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता नवीन दर 7.55 टक्के होईल. (SBI Rates Hike)

FD वर सुद्धा एसबीआयने वाढवले दर पण…
SBI ने 15 डिसेंबर 2021 पासून 2 कोटी रुपयांच्या वरील मुदत ठेवीवर (Term Deposits) व्याज सुद्धा वाढवले आहे.
तसेच 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडी (FD) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

 

ग्राहकांना मोठा झटका
बँकेने बेस रेट वाढवल्याने थेट परिणाम एसबीआयच्या ग्राहकांवर पडणार आहे.
बेस रेटमध्ये वाढ झाल्याने व्याजदर अगोदरच महाग होतील. ज्यामुळे कर्ज घेणार्‍या ग्राहकांना जास्त व्याज द्यावे लागेल.
बँकेच्या या पावलांनी होम लोन, ऑटो लोन, बिझनेस लोन आणि पर्सनल लोनचे दर वाढतील.
ग्राहकांना आता पहिल्यापेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल.

 

Web Title :- SBI Rates Hike | state bank of india sbi hike base rate by 10 basis points bps sbi loan rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 122 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bala Nandgaonkar | राज ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

Monalisa Bold Video-Photo | मोनालिसानं कधी निळी तर कधी पिवळी साडी नेसून सोशल मीडियाचं वाढवलं तापमान, पापणी लवायच्या आतच बदलला लूक

Sachin Tendulkar-Dharmendra | क्रिकेटचे महागुरू सचिन तेंडूलकर आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांची विमानात झाली अचानक भेट, मास्टर ब्लास्टर रमला वीरेंद्र सेहवागच्या आठवणीत

Google Chrome User Update | ‘गुगल क्रोम’ केले नसेल अपडेट तर हॅकर्सला पडाल बळी, सरकारने यूजर्सला दिला इशारा