SBI चा कोट्यावधी ग्राहकांना झटका ! बँकेनं FD नंतर आता ‘या’ खात्यावरील व्याजदरात केली ‘घट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने एफडीच्या व्याजदरात कपात केल्यानंतर आता एक आठवड्यानंतर आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉजिटच्या व्याजदरात कपात केली आहे. आता आरडीवर 0.15 टक्के कमी व्याज मिळेल. 1 ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी असलेल्या आरडी खात्यावरील व्याज 6.25 टक्क्यांवरुन 6.10 टक्के झाले आहे. 10 जानेवारीला बँकेने 1 ते 10 वर्षांच्या कालावधी साठी असलेल्या लॉंग टर्म डिपॉजिट्सवरील दरात देखील 0.15 टक्के कपात केल्याची घोषणा केली होती.

एसबीआयच्या आरडी रिकरिंग डिपॉजिटचे नवे व्याज दर –
1 वर्षांपासून 2 वर्षांपर्यंतचे व्याज दर 6.10 टक्के आहे.
2-3 वर्षांसाठीचे व्याज दर 6.10 टक्के आहे.
3-5 वर्षांसाठी व्याज दर 6.10 टक्के आहे.
5-10 टक्के व्याज दर 6.10 टक्के आहे.

SBI आरडी खातेदारांना दर महिन्याला 100 रुपये जमा करणे आवश्यक आहे. बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसचे आरडीवरील व्याज दर आधिक आहेत. सध्या SBI आरडीवर 6.10 टक्के दराने व्याज देते तर पोस्ट ऑफिस आरडीवर 7.20 टक्के व्याज देते.

SBI मध्ये कसे सुरु कराल आरडी खाते –
1. एसबीआय नेट-बँकिंगमध्ये लॉन इन करुन फिक्स्ड डिपॉजिटच्या अंतर्गत ई-आरडी/ ई-एसबीआय फ्लेक्सी डिपॉजिटवर क्लिक करा.
2. बँकेत एकापेक्षा जास्त खाती असतील तर सर्व खाती तुम्हाला दिसतील, म्हणजेच सर्व बचत आणि चालू खाते तुम्हाला दिसतील. आता ते खाते निवडा ज्याला आरडी खाते लिंक करायचे आहे. मासिक हप्ता निवडा, कालावधीनुसार व्याज दर निश्चित होईल.
3. हे शक्यतो फिक्स्ड डिपॉजिट दर एवढेच असेल. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज मिळू शकते. जर पात्र असाल तर सीनिअर सिटिजन ऑप्शनवर क्लिक करा.
4. मॅच्युरिटीची रक्कम बचत खात्यात मिळवण्यासाठी देखील पर्याय उपलब्ध असेल, तो निवडल्यास मॅच्युरिटीची रक्कम फिक्स्ड डिपॉजिटमध्ये बदलून जाईल. सर्व नियम आणि अटी वाचून मगच सेक्शनवर क्लिक करा.
5. पुढील पेजवर नाव, होल्डिंगची पद्धत आणि नॉमिनेशनसंबंधित माहिती दिसेल. कन्फर्म बटनवर क्लिक करुन ई-आरडी तयार होईल. रेफरेंस नंबर आणि आरडी खाते क्रमांक तुम्हाला मिळेल.
6. तुम्ही ई-आरडीची प्रिंट घेऊन डाऊनलोड देखील करु शकतात. याशिवाय तुम्ही कोणतीही स्टॅंडिग इंस्ट्रक्शन देऊ शकतात आणि त्याला ऑनलाइन करु शकतात.
7. या योजनेत तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी रक्कम काढू शकतात. खाते सुरु केल्यानंतर 1 वर्षांनंतर एकूण रक्कमेच्या 50 टक्के हिस्सा तुम्हाला खात्यातून काढता येईल. या व्याजाची रक्कम लम सम रक्कम असेल, जी तुम्ही एक वर्षांनंतर कधीही काढू शकतात.

एसबीआय आरडीचे फायदे –
– जेव्हा कोणाकडे कमी कालावधीसाठी बचत करण्यासाठी रक्कम नसते तेव्हा आरडी उपयोगी ठरते.
– या खात्याद्वारे तुम्ही दरमहा काही रक्कम बचत करु शकतात. निश्चित परतावा हवा आहे, जे जोखीम घेऊ इच्छित नाहीत, त्यांना आरडी हा एक चांगला पर्याय आहे.
– यात एक वर्षासाठी गुंतवणूक केली जाते. कालावधी संपल्यावर मॅच्युरिटीची रक्कम व्यक्तीला दिली जाते.
– यात मूळ रक्कम आणि त्यावर कमावलेले व्याज सहभागी असते. अशा प्रकारचे रिकरिंग डिपॉजिट आहेत ज्यात विविध रक्कम जमा केली जाऊ शकते, परंतु अनेक वेळा दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा केली जाते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like