SBI RD Scheme | एसबीआयच्या मंथली डिपॉझिटमध्ये करा 10 हजार रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर होईल इतक्या लाखाचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI RD Scheme | आजही देशात मोठा मध्यमवर्ग (Middle Class) आहे, ज्यांना जोखीम न घेता गुंतवणूक करायला आवडते. असाच एक गुंतवणुकीचा (Investment Tips) पर्याय म्हणजे बँकांची आवर्ती ठेव (Recurring Deposit) होय. यामध्ये तुम्ही दर महिन्याला SIP प्रमाणे गुंतवणूक करू शकता. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI देखील आपल्या ग्राहकांना आवर्ती ठेव (RD) खाते उघडण्याची सुविधा देते. (SBI RD Scheme)

 

बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही आवर्ती ठेव खाते (Recurring Deposit Scheme) उघडू शकता. तुम्ही ते अगदी 100 रुपयांमध्ये उघडू शकता. त्याच वेळी, कमाल ठेवीवर कोणतीही निश्चित मर्यादा नाही. एसबीआयमध्ये 12 महिने ते 120 महिन्यांसाठी आरडी खाते उघडता येते.

दरमहा 10 हजाराच्या गुंतवणुकीवर मिळतील इतके लाख

एसबीआय आपल्या ग्राहकांना आवर्ती जमा अर्थात RD वर मुदत ठेवीच्या कालावधीवर मिळणारा व्याजदर देते.

या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा 10,000 रुपये जमा केल्यास, 5 वर्षानंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर 6.60 लाख रुपये मिळतील. या योजनेत जमा केलेल्या पैशावर तुम्हाला वार्षिक 5.40 टक्के व्याज (Rate of Interest) मिळेल. यामध्ये 6 लाख रुपये गुंतवणूक आणि 89,699 रुपये व्याजाचे मिळतात. (SBI RD Scheme)

 

एसबीआय आरडी खात्यावर घेऊ शकता कर्ज

ग्राहक गरज पडल्यास आरडी खात्यावर कर्जदेखील घेऊ शकतात. आरडी खात्यातील ठेवीवर ग्राहकांना कर्ज सहज उपलब्ध आहे.

तसेच, बँक आरडी खात्यासाठी युनिव्हर्सल पासबुक (Universal Passbook) देखील देते. यामध्ये व्यक्तीला नॉमिनेशनचा लाभ सुद्धा मिळतो. हे आरडी खाते (SBI RD Account) बँकेच्या एका शाखेतून दुसर्‍या शाखेतही ट्रान्सफर करता येते.

 

वेळेवर हप्ता जमा न केल्याने पेनल्टी

जर तुम्ही आरडीचा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर तुम्हाला त्यावर पेनल्टी द्यावी लागते.

एसबीआयमध्ये, प्रत्येक 100 रुपयांसाठी, तुम्हाला दररोज 1.50 रू. दंड भरावा लागेल.
हा नियम 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आरडीसाठी आहे.
त्याच वेळी, 5 वर्षांपेक्षा जास्त वर्षांच्या आरडीवर, हा दंड प्रति 100 रुपये प्रतिदिन 2 रुपये आकारला जाईल.

 

Web Title :- SBI RD Scheme | sbi scheme of recurring deposit know about the details of sbi rd scheme deposit10,000 rupees per month and you will get this amount

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fruits To Avoid For Weight Loss | जर तुम्ही खात असताल ‘ही’ फळे तर वजन कमी होण्याऐवजी वाढेल ! जाणून घ्या कोणती फळे वाढवतात कॅलरीज

 

Pimpri Corona Updates | पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 4376 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Period Pain | पीरियडच्या दरम्यान पोट आणि कंबरदुखीचा होत असेल त्रास तर ‘हे’ 5 घरगुती उपाय अवलंबा; जाणून घ्या