SBI मध्ये ‘या’ पदासाठी भरती, 45000 रूपये पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI ने बँक मेडिकल ऑफिसर या पदासाठी 56 रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांना या पदासाठी 19 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज करण्याचे SBI ने आवाहन केले आहे. या पदांसाठी देशातील 15 शहरात नियुक्ती होणार आहे.

कोणत्या शहरात किती जागा –

पटना – 2, अहमदाबाद – 3, अमरावती – 3, बेंगळुरु – 5, भोपाळ – 2, भुवनेश्वर – 3, चंदीगड – 8, चेन्नई – 1, नवी दिल्ली – 2, हैद्राबाद – 5, जयपूर – 7, लखनऊ, महाराष्ट्र – 4, नॉर्थ ईस्ट – 02 आणि तिरुअनंतपूरम – 5 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

या पदांसाठी पगार – 31,705 ते 45,950 रुपये

शैक्षणिक पात्रता –

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यता प्राप्त संस्थामधून डिग्री प्राप्त.
संबंधित क्षेत्रात 5 वर्ष आणि पीजी डिग्रीसाठी – 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

वय –
वय जास्तीत जास्त 35 वर्ष
एससी, एसटी – 5 वर्षांची अधिक सूट
ओबीसी – 3 वर्षांची अधिक सूट
निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.

परिक्षा शु्ल्क –

जनरल कॅटेगिरी – 750 रुपये शुल्क
एससी, एसटी, दिव्यांग – 125 रुपये शुल्क
ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया –

1. www.sbi.co.in च्या होमपेजवरील करिअरवर क्लिक करा.
2. करंट ओपनिंग्स पर्यायावर क्लिक करुन जाहिरातीवर क्लिक करा.
3. अल्पाई ऑनलाइन या पर्यायावर क्लिक करा.
4. अर्ज करण्याची विंडो सुरु होईल. त्याप्रमाणे अर्ज पूर्ण भरल्यावर त्यात फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करुन टाका.
5. अर्ज सब्मिटवर क्लिक करा.
6. शुल्क भरण्याचा पर्याय सुरु होईल, त्यात पेमेंट केल्यानंतर ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
7. फॉर्मची एक प्रिंट काढून घ्या.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like