SBI भरती २०१९ ! ७७ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) आणि अन्य पदांसाठी करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय स्टेट बँकेत ‘स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर’ आणि ‘डेप्युटी जनरल मॅनेजर’ पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या जागेसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून १२ ऑगस्ट २०१९ पर्यंत उमेदवार या जागांसाठी अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ ऑगस्ट २०१९

जागांची माहिती

१)डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅपिटल प्लॅनिंग ) – १ जागा

२)एसएमई क्रेडिट अ‍ॅनालिस्ट (सेक्टर स्पेशलिस्ट) – ११ जागा

३)एसएमई क्रेडिट अ‍ॅनालिस्ट (स्ट्रक्चरिंग) – ४ जागा

४)एसएमई क्रेडिट अ‍ॅनालिस्ट – १० जागा

५)क्रेडिट अ‍ॅनालिस्ट – ५० जागा

६)डेप्युटी जनरल मॅनेजर (अ‍ॅसेट लाइबिलिटी मॅनेजमेंट) – १ जागा

शैक्षणिक पात्रता

१)डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅपिटल प्लानिंग) – कोणत्याही विजयात ग्रॅज्युएशन, चार्टर्ड अकाउंटंट पदवी, त्याचबरोबर फायनान्स विषयात पदविका

२)एसएमई क्रेडिट अ‍ॅनालिस्ट (सेक्टर स्पेशलिस्ट, स्ट्रक्चरिंग) – मान्यताप्राप्त महाविद्यालयातून बीई / बीटेक आणि एमबीए

३) सीएफए क्रेडिट अ‍ॅनालिस्ट – सीए, एमबीए किंवा पीजीडीएम

४)डेप्युटी जनरल मॅनेजर (अ‍ॅसेट लाइबिलिटी मैनेजमेंट) – एमबीए फायनान्स आणि चार्टर्ड अकाउंटंट

वयाची अट

डेप्युटी जनरल मॅनेजर (कैपिटल प्लानिंग, अ‍ॅसेट लायबिलिटी मैनेजमेंट) – ४५ वर्ष

अशाप्रकारे करा अर्ज

इच्छुक उमेदवार १२ ऑगस्ट २०१९ पर्यंत ऑनलाईन माध्यमातून या जागांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर केलेल्या अर्जाच्या नमुन्याची एक प्रत स्वतःजवळ बाळगावी.

या वेबसाईटवर करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी भारतीय स्टेट बँकेच्या https://bank.sbi/careers/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

आरोग्यविषयक वृत्त