SBI Recruitment 2020 : स्टेट बँकेमध्ये निघाली मेगा भरती, मिळणार ‘शानदार’ सॅलरी, ‘इथं’ करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेत नोकरीसाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने कार्यकारी व वरिष्ठ कार्यकारी पदासाठी मोठी भरती काढली आहे. या भरती अंतर्गत ३२६ पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाकाठी ६ लाख ते १० लाख वेतन दिले जाईल.

पात्रता
कार्यकारी (एफआय आणि एमएम) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ग्रामीण अर्थव्यवस्था/ कृषी आणि एलाईड ऍक्टिव्हिटी/ हॉर्टिकल्चरमध्ये पदवी असणे आवश्यक आहे. वरिष्ठ कार्यकारी (सोशल बँकिंग आणि सीएसआर) पदासाठी अर्ज करणार्‍या तरुणांकडे पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय वरिष्ठ कार्यकारी पदासाठी तीन वर्षे कामाचा अनुभवही आवश्यक आहे.

वयोमर्यादा
कार्यकारी पदासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित केली गेली आहे. तर वरिष्ठ कार्यकारी पदासाठी ३५ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. ३१ मार्च २०२० च्या आधारावर वयाची गणना केली जाईल.

अर्ज शुल्क
या भरती अंतर्गत जीईएन/ ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज फी भरावी लागेल. तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरले जाऊ शकते.

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया आज २३ जूनपासून सुरू झाली आहे आणि १३ जुलै २०२० पर्यंत उमेदवार त्यासाठी अर्ज करु शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसबीआयच्या www.sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.