SBI Recruitment 2022 | स्टेट बँकेत परीक्षा न देता मिळेल नोकरी, 12 जूनपर्यंत करा अप्लाय; जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 32 पदांची भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 12 जून 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज (Online Application) करू शकतात. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. (SBI Recruitment 2022)

 

या भरती प्रक्रियेद्वारे विविध विभागांमध्ये एजीएमची 4 पदे भरण्यात येणार आहेत. व्यवस्थापकाची 2 पदे, उपव्यवस्थापक (नेटवर्क इंजिनियर) 6 पदे, उपव्यवस्थापक (साइट इंजिनियर कमांड सेंटर) 6 पदे आणि उपव्यवस्थापक (स्टॅटिसटीशियन) 5 पदे भरायची आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

 

SBI Recruitment 2022 : वयोमर्यादा
एजीएम पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 45 वर्षे ठेवण्यात आली आहे. व्यवस्थापक पदासाठी वयोमर्यादा 38 वर्षे आणि उपव्यवस्थापक पदासाठी 35 वर्षे आहे.

 

SBI Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता

एजीएम (आयटी-टेक ऑपरेशन्स) मध्ये बीई, बी. टेक आणि याच्या समकक्ष पदवी असावी. किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.

डेप्युटी मॅनेजर (स्टॅटिसटीशियन) साठी उमेदवार 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा, अर्जदार स्टॅटिस्टीक्स किंवा इकॉनॉमिस्टिकमध्ये पास असावा.

डेप्युटी मॅनेजर (साइट इंजिनिअर कमांड सेंटर) या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संबंधित विषयात बीई, बी.टेक. किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.

 

Reliance Jio Price Hike | जिओने दिला मोठा झटका ! 150 रुपये महाग झाला ‘हा’ स्वस्त प्लान, 1 वर्षापर्यंत चालतो

 

डेप्युटी मॅनेजर (नेटवर्क इंजिनीअर) या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित विषयात बीई, बीटेक किंवा त्याच्या समकक्ष असणे आवश्यक आहे.

व्यवस्थापक (आयटी सिक्युरिटी एक्स्पर्ट) या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित विषयातील बीई, बीटेक. किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला 60 टक्के गुण असावेत.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख
पात्र उमेदवार 12 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
अधिसूचना वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.sbi.co.in/documents/77530/25386736/20052022_ADVT_No_CRPD_08+fo+2022-23.pdf/778a7d22-2755-c993-2953-0f8a0104d291?t=1653051113720 

 

Web Title :- sbi recruitment 2022 state bank of india sbi recruitment of specialist cadre officers know date fees selection process here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा