खुशखबर ! १ ऑगस्टपासून होणार बँकेचे ‘हे’ ऑनलाइन व्यवहार एकदम ‘फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय स्टेट बँक ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करुन देत आहे. पुढील महिन्यापासून म्हणजे १ ऑगस्टपासून एसबीआयकडून ऑनलाइन सुविधेशी संबंधित शुल्क आकारण्यात येणार नाही. याच कारणाने बँक आता देवाण घेवाणीच्या व्यवहारांवर आयएमपीएस शुक्ल आकरणार नाही, त्यामुळे यानंतर या सेवा पूर्ण पणे मोफत असतील. याचा फायदा बँकेच्या ग्राहकांना होणार आहे.

१ ऑगस्टपासून लागू होणार सूट –
एसबीआयकडून या सेवेच्या शुल्कात सूट देण्यात आली आहे त्यामुळे बँक आपल्या ग्राहकांना ही सेवा मोफत उपलब्ध करुन देणार आहे. याची अमंलबजावणी १ ऑगस्टपासून होणार असून स्टेट बँकेच्या ऑनलाइन व्यवहारांवर आयएमपीएस शुल्क लागणार नाही, यामुळे ग्राहकांचे या व्यवहारांवर कापले जाणारे शुल्क यापुढे कापले जाणार नाही.

२ लाख रुपयांपर्यंत करा पैशांचे हस्तांतरण –
याशिवाय सर्व टप्प्यातील एनईएफटी आणि आरटीजीएस शुल्कात बँकेने कपात करुन २० टक्के केले आहे. तसेच १ हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन व्यवहार केल्यास आयएमपीएस शुल्क आकारले जाणार नाही. आयएमपीएस ही एक इंस्टंट इंटरबँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा आहे. या सेवेद्वारे मोठी रक्कम या खात्यातून त्या खात्यात ट्रान्सफर करु शकतात. ही सेवा २४ तास सुरु असते. ही सुविधा वापरुन ग्राहक कधीही पैसे ट्रान्सफर करु शकतात. या सुविधेतून आधिकाधिक 2 लाख रुपये ट्रान्सफर करता येतात.

आरोग्यविषयक वृत्त –