SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा ! बँकेनं नॉन-होम ब्रँचमधून कॅश काढण्याची ‘मर्यादा’ वाढवली, जाणून घ्या Limits

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोविड महामारीमुळे भारतीय स्टेट बँकेने (SBI) नॉन-होम ब्रँचमधून कॅश काढण्याची मर्यादा वाढवली आहे. चेक किंवा विड्रॉल फॉर्मद्वारे तुम्ही हे पैसे काढू शकता. होम ब्रँच म्हणजे जिथे तुमचे खाते उघडलेले असते, नॉन-होम ब्रँचमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवल्याचा अर्थ हा आहे की, तुम्ही आता एसबीआयच्या कोणत्याही शाखेतून जास्त पैसे काढू शकता.

मोठी वाढ
भारतीय स्टेट बँकेने ट्विट करून सांगितले आहे की, जर कुणी व्यक्ती कोणत्याही नॉन-होम ब्रँचमध्ये आपल्या सेव्हिंग पासबुकसह आला आणि त्याचे स्वताचे खाते असेल तर तो विड्रॉल फॉर्मद्वारे एका दिवसात आता 25,000 रुपये काढू शकतो. अगोदर ही मर्यादा केवळ 5,000 रुपये होती.

अशाच प्रकारे तो स्वतासाठी चेकद्वारे एका दिवसात 1 लाख रुपये काढू शकतो. अशा प्रकारे थर्ड पार्टी म्हणजे एखाद्या दुसर्‍याच्या द्वारे केवळ चेकने नॉन-होम ब्रँचमधून एका दिवसात कमाल 50,000 रुपये काढले जाऊ शकतात.

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

विड्रॉल फॉर्मने दुसरा व्यक्ती पैसे काढू शकत नाही
बँकेने म्हटले आहे की, थर्ड पार्टी म्हणजे अन्य व्यक्तीला नॉन-होम ब्रँचमधून विड्रॉल फॉर्मद्वारे पैसे काढण्याची परवानगी नाही. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने खाते आहे, तोच पैसे काढू शकतो. हे बदल 30 सप्टेंबर 2021 पर्यंतसाठी केले आहेत.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’