SBI ने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या अनेक सेवांमध्ये बदल करत आहे. काही दिवसांपूर्वीच एसबीआयने जुने एटीएम बंद करून नवीन एटीएम सुरु केले आहे. त्यानंतर आता एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहे.

एसबीआय ग्राहकांसाठी क्लासिक, ग्लोबल इंटरनॅशनल, गोल्ड इंटरनॅशनल आणि प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड या चार प्रकारचे डेबिट कार्ड जारी करते. हे डेबिट कार्डे जारी करण्यासाठी बँक काही शुल्क आकारते. पैसे काढण्याचे नियम या सर्व प्रकारच्या डेबिट कार्डावर लागू होतील.

  • पैसे काढण्यासाठी एटीएमने बदललेले नियम
    एटीएमने पैसे काढता येण्याची दैनिक मर्यादा आणि वार्षिक शुल्क यांमध्ये बदल केले आहेत.
  • पैसे काढता येण्याची दैनिक मर्यादा
    एसबीआय बहुतेक ग्राहकांना क्लासिक डेबिट कार्ड व ग्लोबल इंटरनॅशनल डेबिट कार्ड हे दोन कार्डच जारी करते. क्लासिक डेबिट कार्ड धारक एटीएममधून दररोज २० हजार रुपये काढू शकतात. ग्लोबल इंटरनॅशनल डेबिट कार्ड धारक दररोज ४० हजार रुपये काढू शकतात.
  • वार्षिक शुल्क
    क्लासिक डेबिट कार्डवर बँक १२५ रुपये (जीएसटी अतिरिक्त) वार्षिक शुल्क देखील आकारते. त्याच वेळी कार्ड हरवल्यावर ३०० रुपये (जीएसटी अतिरिक्त) आकारते. इंटरनॅशनल डेबिट कार्डवर १७५ रुपये, प्लॅटिनम डेबिट कार्डवर १७५ रुपये आणि प्रीमियम व्यवसाय कार्डवर ३५० रुपये शुल्क घेते.