SBI नं कोटयावधी लोकांना केलं सावध, सांगितलं – ‘परवानगी शिवाय केलं हे काम तर कडक कारवाई होणार’

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने लोकांना अलर्ट करत सांगितले आहे की, जर तुम्ही कोणताही रजिस्टर्ड ब्रँड किंवा लोगोचा विना परवानगी वापर करत असाल तर तो दंडणीय गुन्हा आहे आणि यासाठी कडक कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. अनेकदा लोक आपला छोटासा बिझनेस किंवा कोणतेही काम सुरू करताना एखाद्या फेमस ब्रँडचे नाव किंवा लोगोचा वापर करतात. अशाप्रकारच्या लोकांविरूद्ध आता कडक कारवाई केली जाईल.

एसबीआयने केले ट्विट
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर ट्विट करत लिहिले आहे की, आमच्या अधिकार्‍यांनी अनेक खात्यांकडे लक्ष दिले असता आढळले की, अनेक लोग प्रसिद्ध ब्रँडचे नाव किंवा लोगोचा वापर करत आहेत. हा पूर्णपणे दंडणीय गुन्हा आहे.

या अ‍ॅक्ट अंतर्गत केला जाईल दंड
अशा लोकांच्याविरूद्ध इंडियन पॅनल कोड – 1882, इर्न्फार्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्ट – 2000 (सेक्शन 66सी, 66डी), ट्रेडमार्क अ‍ॅक्ट – 1999, आणि कॉपीराईट अ‍ॅक्ट – 1957 च्या अंतर्गत अ‍ॅक्शन घेतली जाईल.

फेक इमेलला फसू नका
एसबीआयने म्हटले आहे, आमच्या ग्राहकांना फेक ई मेल्स पाठवले जात आहेत. या ई मेलचा एसबीआयचा संबंध नाही. असे ई मेल ग्राहकांनी ओपन करू नयेत. बँक ग्राहकांनी सोशल मीडियावर सतर्क राहावे आणि कोणत्याही बनावट संदेशाला बळी पडू नये.

अधिकृत पोर्टलचा करा वापर
एसबीआय ऑनलाइन बँकिंग सर्व्हिसचा वापर करणार्‍या ग्राहकांनी अधिकृत पोर्टलचा वापर करावा. अन्यथा तुम्ही बँकिंग फ्रॉडला बळी पडू शकता, असे एसबीआयने म्हटले आहे.