SBI Salary Account | SBI च्या ‘या’ खात्यावर तुम्हाला मिळतील 30 लाखापर्यंतच्या ‘या’ सुविधा अन् 5 मोठे फायदे, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे State Bank Of India म्हणजे SBI चे सॅलरी अकाऊंट (SBI Salary Account) असेल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. एसबीआय ग्राहकांना सॅलरी अकाऊंटवर (SBI Salary Account) अनेक प्रकारच्या ऑफर देते. यामध्ये झीरो बॅलन्स, 30 लाखापर्यंतचा इन्श्युरन्स, कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये मोफत अमर्याद व्यवहार, मोफत ऑनलाइन NEFT/RTGS, ओवरड्राफ्टसह इतर सुविधांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…
एसबीआय सॅलरी अकाऊंटचे 5 फायदे…
1. अॅक्सीडेंटल डेथ कव्हर (Accidental death cover) :
एसबीआय सॅलरी खातेधारकाला 20 लाखापर्यंत अॅक्सीडेंटल डेथ कव्हरचा अधिकार आहे.
2. एयर अॅक्सीडेंटल डेथ कव्हर (Air accidental death cover) :
विमान दुर्घटना मृत्यूप्रकरणात एसबीआय वेतन खातेधारकाला 30 लाखापर्यंत विमा (मृत्यु) कव्हर मिळते.
3. कर्ज प्रक्रिया शुल्कात (loan processing fee) 50% सूट :
पर्सनल लोन, होम लोन, कार लोन इत्यादी कर्जावर 50 टक्के प्रोसेसिंग फीमध्ये सूट मिळते.
4. ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft facility) : एसबीआय वेतन खातेधारकांना ओव्हर ड्राफ्ट सुविधेंतर्गत दोन महिन्याचे वेतन देते.
5. लॉकर शुल्कात सूट (Locker fee discount) : एसबीआय वेतन खातेधारकांना लॉकर शुल्कात 25 टक्के सूट देते.
Web Title : SBI Salary Account | sbi customers get 3 lakh free insurance and other benefits on salary account
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Varsha Gaikwad | शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, यंदाही शाळेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात