‘या’ बँकेत बचत खाते काढा, FD पेक्षा अधिक जास्त ‘फायदा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन सुविधा आणत असते. देशात एसबीआयचे करोडो ग्राहक आहेत. आपल्या ग्राहकांना विविध सुविधा देऊन अनेक ग्राहकांना आकर्षित करत असते. अशाच प्रकारची एक नवीन योजना बँकेने आणली असून या खात्याद्वारे तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत करू शकणार आहात. जाणून घ्या या नवीन खात्याबद्दल

सेविंग्स प्लस अकाउंट
एसबीआयच्या या नवीन खात्यामध्ये तुम्हाला मल्टी ऑप्शन डिपॉजिट खात्याप्रमाणेच सुविधा आणि लाभ मिळतात. या खात्यात एका विशिष्ट रकमेनंतर जमा होणारी रक्कम हि सरळ तुमचे फिक्सड डिपॉजिट म्हणजेच एफडी होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला या खात्याद्वारे अधिक व्याज मिळण्याबरोबरच बचत देखील मोठ्या प्रमाणावर होते.

या व्यक्ती उघडू शकतात खाते
एसबीआयचे हे खाते कोणताही व्यक्ती उघडू शकतो. सेविंग खात्याप्रमाणेच हे खाते देखील तुम्ही बँकेत उघडू शकता. हे खाते तुम्ही सिंगल किंवा जॉईन्टमध्ये देखील खोलू शकता.

इतका हवं मिनिमम बॅलन्स
या खात्यात कमीतकमी बॅलेन्स ठेवणे अनिवार्य आहे. मेट्रो शहरांमध्ये ३०००, शहरी भागात ३०००, छोट्या शहरांमध्ये २००० तर ग्रामीण भागांमध्ये १००० रुपये कमीतकमी रक्कम ठेवावी लागणार आहे.

इतकी रक्कम करता येणार ट्रान्स्फर
या खात्यात तुमची २५००० रुपयांवरील रक्कम थेट फिक्स्ड डिपॉजिट मध्ये जमा होणार आहे. या खात्यातून तुम्ही दिवसाला जास्तीत जास्त ३५००० रुपये काढू शकणार आहेत.

मिळतात या सुविधा
या खात्यात तुम्हाला बेसिक बचत खात्यात मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतात. म्हणजेच एटीएम कार्ड, मोबाइल बँकिंग , इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस अलर्ट सारख्या सुविधा मिळणार आहेत. त्याचबरोबर या खात्यावर तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –