बँक खात्यात पैसे जमा करण्याचे नियम बदलले : ‘या’ नवीन नियमामुळे व्यवहार होणार सुरक्षित, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही स्वत: तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी फार महत्वाची आहे. आता यापुढे तुमच्या बँक खात्यात तुमच्या परवानगीशिवाय कुणीही पैसे जमा करू शकणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या संदर्भात नवीन नियम बनविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सांगितले कि, सरकार बँक खातेधारकांना अधिक सक्षम आणि मजबूत बनवण्यासाठी नवीन पावले उचलणार आहे.
सध्या बँक खातेधारकांच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्यासाठी कोणतेही नियम नाहीत. त्यामुळे त्याच्या खात्यात कुणीही पैसे जमा करू शकतो. मात्र यापुढे तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी दुसऱ्या माणसाला आता तुमच्या परवानगीची गरज पडणार आहे. त्याचबरोबर सरकारी बँकांच्या कारभारासंदर्भात देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
नोटबंदीच्या काळात ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अनेक नागरिकांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली होती. या रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तींची कोणत्याही प्रकारची माहिती सरकारला मिळाली नाही. यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले.
आता काय आहे नियम
१)सध्या कोणताही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात रक्कम जमा करू शकतो.
२)त्याच्याकडे फक्त त्या व्यक्तीचा बँक अकाउंट नंबर असायला हवा.
३)यासाठी त्याला दुसऱ्या व्यक्तीची कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काळ्या पैशाच्या देवाणघेवाणीला चाप बसणार असल्याचे बोलले जात आहे.
असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य
केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान
दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’
‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय
व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका
घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !
‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय
पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी