SBI नं जारी केला अलर्ट ! 15 सप्टेंबर रोजी 2 तासांसाठी बंद राहणार बँकिंग सेवा, व्यवहारांवर होणार परिणाम, जाणून घ्या वेळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  SBI | भारतातील सर्वात मोठी असणारी बॅंक स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची सुचना दिली आहे. उद्या बुधवारी (15 सप्टेंबर) रोजी एसबीआय बॅँकेच्या काही सेवा 2 तास बंद राहणार आहेत. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकाला उद्या 2 तास कोणताही व्यवहार करता येणार नाही. अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकाला दिल्या आहेत.

एसबीआयने सिस्टमच्या देखभालीमुळे 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहणार असल्याची माहिती एसबीआयने ट्विटच्या माध्यमातुन दिली आहे.
बॅंकेनं म्हटलं आहे की, या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. तसेच, 15 सप्टेंबरच्या रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत (120 मिनिटे) या सेवा उपलब्ध होणार नाहीत.
तसेच या काळात ग्राहकांनी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर व्यवहारांसह अन्य उपक्रम टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं SBI कडून सांगण्यात आलं आहे.

 

एसबीआय ची इंटरनेट बँकिंग सेवा 8 कोटीहून अधिक लोक वापरतात आणि मोबाईल बँकिंगचा वापर सुमारे 2 कोटी लोक करतात.
दुसरीकडे, योनोवर नोंदणीकृत ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे.
ज्यावर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन करतात.
दरम्यान, बॅंकेच्या ग्राहकाची कोणतेही ताराबंळ होऊ नये यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे महत्वाची सुचना दिली आहे.

 

Web Title : SBI | SBI alert billions sbi customers service will be closed 2 hours get rid clutter fast

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bad Habits For Health | जर तुमच्यात सुद्धा असतील ‘या’ 4 वाईट सवयी तर तात्काळ बदला, भविष्यात होऊ शकतो आरोग्याला धोका

Pravin Darekar | ‘थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, प्रसिद्धीसाठी केलेल्या वक्तव्यांना मी महत्व देत नाही’

Petrol-Diesel Price | खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईपासून मिळू शकतो दिलासा, सरकार घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय