सुखवार्ता ! SBI बँकेनं केली व्याज दरात कपात; आता होम, ऑटो अन् पर्सनल लोनसह इतर कर्जावरील EMI भरावा लागेल कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना दिलासा देत व्याजदरात कपात (Rate Cut) करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने 14 सप्टेंबर 2021 ला निर्णय घेतला आहे की, आधार दरात (Base Rates) 5 आधार अंक म्हणजे 0.05 टक्केची कपात केली जाईल.
यानंतर नवीन व्याजदर 7.45 टक्के होतील. तसेच, बँकेने म्हटले आहे की, लेंडिंग रेट (PLR) मध्ये सुद्धा 5 आधार अंकाची कपात करून 12.20 टक्के केला जाईल. नवीन दर 15 सप्टेंबर 2021 म्हणजे उद्यापासून लागू होतील.
एसबीआयच्या या निर्णयाचा सामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम होईल. यामुळे एसबीआयच्या ग्राहकांना आता होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनसह अनेक प्रकारचे मासिक हप्ते कमी द्यावे लागतील. जुलै 2010 च्या नंतरसाठी होम लोन बेस रेटने लिंक्ड आहेत.
याबाबतीत बँकांना स्वातंत्र्य आहे की, त्यांनी कॉस्ट ऑफ फंड्सची गणना सरासरी फंड कॉस्टच्या हिशेबाने करावी किंवा एमसीएलआरच्या हिशेबाने करावी.
यामध्ये अगोदरच्या मागील आठवड्यात खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने होम लोनच्या व्याजदरात कपातीची घोषणा केली होती.
कोटक महिंद्रा बँकेने 0.15 टक्के कपात केली आहे.
कपातीनंतर होम लोनचा व्याजदर 6.50 टक्केवर आला आहे.
Web Titel :- SBI | sbi cuts base rate by 5 bps to 7 45 percent and plr to 12 20 percent from 15 sept 2021
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Devendra Fadnavis | ‘कोरोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू’
Naseeruddin Shah | CM योगी यांच्या ‘अब्बाजान’ वक्तव्यावर संतापले नसीरूद्दीन शाह; म्हणाले…