SBI ग्राहकांसाठी ‘गुड न्यूज’, बँकेने उचलले हे मोठे पाऊल

नवी दिल्ली – SBI | जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने IMPS (इन्स्टंट पेमेंट सर्व्हिस) व्यवहाराची मर्यादा 2 लाख रुपयांवरून वाढवून 5 लाख रुपये केली आहे (SBI Increases IMPS Transaction Limit).

 

मात्र, 2 लाख ते रु. 5 लाखांपर्यंतच्या आयएमपीएस व्यवहारांवर एसबीआय रु. 20 अधिक GST आकारेल. आयएमपीएस ही रिअल-टाइम फंड ट्रान्सफरची सुविधा आहे, जी 24 बाय 7 इन्स्टंट इंटरबँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा प्रदान करते. मोबाईल, इंटरनेट, एटीएम, एसएमएस यांसारख्या अनेक चॅनेलवर याचा वापर करता येतो.

 

अनेक बँका IMPS व्यवहार वापरून ग्राहकांकडून शुल्क आकारतात. काही बँका ग्राहकांच्या खात्याच्या प्रकारानुसार किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे आयएमपीएस सेवा मोफत देतात. परंतु, यासाठी शुल्क आकारणार्‍या बँकापैकी एसबीआय ही एक आहे.

 

एसबीआय आयएमपीएसवर किती शुल्क आकारते?

– 1,000 रुपयांपर्यंतच्या आयएमपीएस व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

– 1,000 ते रु. 10,000 च्या आयएमपीएस व्यवहारांवर रु. 2 अधिक जीएसटी लागू होतो.

– 10,000 ते रु. 1,00,000 लाखाच्या आयएमपीएस व्यवहारांवर रु. 4 अधिक जीएसटी लागू होतो.

– 1,00,000 लाख ते रु 2,00,000 लाखाच्या आयएमपीएस व्यवहारांवर रु. 12 अधिक जीएसटी लागू होतो.

– 2,00,000 लाख ते 5,00,000 लाखांमधील आयएमपीएस व्यवहारांवर 20 रुपये अधिक जीएसटी लागू होईल.

 

SBI ने आयएमपीएस व्यवहारांसाठी 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा नवीन स्लॅब तयार केला आहे. मात्र, जुन्या स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

 

Web Title :- SBI | sbi increases imps transaction limit to five lakhs charge per transaction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा