SBI ची बेस्ट योजना ! घरबसल्या महिन्याला कमवू शकता 60 हजार रुपये; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. SBI आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना (Plan) आखत असते. त्याचबरोबर आणखी काही सुरक्षित आणि लाभदायक योजना देखील देत असते. दरम्यान SBI आता घरबसल्या एखादा व्यवसाय कसा करायचा अथवा त्या व्यवसायामधून 60 हजार रुपये कसे मिळवायचे याबाबत एक नवी योजना आणली आहे.

 

SBI ची एटीएम फ्रँचायजी (SBI ATM Franchise) घेऊन तुम्ही कमाई करू शकणार आहात. ATM यंत्र बसवून देणारी कंपनी वेगळी असते. कधीही कोणत्याही बँकेतर्फे ATM लावून दिलं जात नाही. बँकेतर्फे काही कंपन्यांना ATM लावून देण्याचं कंत्राट दिले जातं. ज्या प्रत्येक ठिकाणी ATM मशीन लावण्याचं काम करतात. कशाप्रकारे एटीएम फ्रँचायजी घेऊन चांगली कमाई करता येणार याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

ATM फ्रँचायजी घेण्यासाठी अटी काय?
– तुमच्याकडे 50-80 स्‍क्वेअर फूट जागा असली पाहिजे.

– दुसऱ्या ATM पासून त्याचं अंतर 100 मीटर असलं पाहिजे.

– ही जागा तळमजला आणि चांगली प्रकाशमय असली पाहिजे.

– 24 तास वीज असली पाहिजे. याशिवाय 1 किलोवॅटचं वीजेचं कनेक्शन हवं.

– या ATM मधून प्रतिदिन साधारण 300 ट्रांजॅक्‍शन्स होण्याची क्षमता असली पाहिजे.

– ATM च्या जागेला काँक्रिटचं छत असलं पाहिजे.

– व्ही सॅट लावण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीकडून नो ऑब्‍जेशन सर्टिफिकेट असणे आवश्यक.

कागदपत्रे –
– Aadhaar Card,

– Pan Card, Voter Card

– अ‍ॅड्रेस प्रूफ – रेशन कार्ड,

– इलेक्ट्रिसिटी बिल

– बँक अकाउंट आणि पासबुक

– फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर

– अन्य डॉक्युमेंट्स

– जीएसटी नंबर

– फायनान्शिअल डॉक्युमेंट्स

 

असं करा ATM शाखेसाठी अर्ज –
SBI ATM ची फ्रँचायजी काही कंपन्या देतात. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. माहितीनुसार, ATM मशीन बसवण्यासाठी कंपन्या वेगळ्या असतात. भारतात प्रामुख्याने ATM बसवण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट Tata Indicash, Muthoot ATM आणि India One ATM जवळ आहे. म्हणून या सर्व कंपन्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन लॉग ईन करून तुम्ही ATM साठी अर्ज करू शकणार आहात.

गुंतवणूक किती?
टाटा इंडिकॅश यामधील सर्वांत मोठी आणि जुनी कंपनी आहे. ही कंपनी दोन लाख रुपयांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर फ्रँचायजी देते. जे रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटलच्या रूपात जमा करावे लागणार आहे. अशाप्रकारे एकूण पाच लाखाची गुंतवणूक असणार आहे.

 

दरम्यान, कमाईबाबत बोलायचं झाल्यास प्रत्येक कॅश ट्रँजॅक्शनमागे 8 रूपये आणि नॉन कॅश ट्रँजॅक्शनमागे 2 रुपये मिळतात. वार्षिक आधारावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 33 ते 50 टक्क्यांपर्यंत आहे. उदा. जर तुमच्या ATM मार्फत रोज 250 ट्रँजॅक्शन होत असतील. ज्यापैकी 65 टक्के कॅश ट्रँजॅक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रँजॅक्शन असतील तर तुमची महिन्याची कमाई साधारण 45 हजार रुपयांच्या आसपास असणार आहे. हेच जर रोज 500 ट्रँजॅक्शन झाल्यास साधारण 88-90 हजार रूपयाचं कमिशन मिळणार आहे. मग तुमच्याकडूनही वरील अटींची पूर्तता होत असेल तर आजच SBI च्या ATM शाखेसाठी अर्ज करा आणि घरबसल्या 60 हजार रूपये कमवा.

 

सविस्तर माहितीसाठी (वेबसाईट) – Tata Indicash – www.indicash.co.in Muthoot ATM – www.muthootatm.com/suggest atm.html India One ATM – india1atm.in/rent your space

 

Web Title :- SBI | sbi new money earning scheme read details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Aadhaar Shila | पत्नीला Wedding Anniversary ला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये करा जमा

 

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीसह सासू, मेहुण्यांनी केली बेदम मारहाण, निवृत्त सैनिकाचा मृत्यू

 

Karuna Munde | ‘ते’ काम बंद करण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार, करुणा धनंजय मुंडे यांची माहिती