SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खुशखबर ! आता ATM मधून फसवून कोणीही काढू शकणार नाही पैसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI | भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) ही आहे. दरम्यान एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती आणली आहे. सध्या सायबर क्राइमचे प्रमाण वाढले असल्याने महत्वाची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. अनेकवेळा एटीएम कार्ड (ATM Card) क्लोन करून अथवा इतर मार्गाने फसवणूक करून एटीएममधून पैसे काढले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र आता तसं होणार नसल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. काय ते सविस्तर जाणून घ्या.

 

एटीएममधून रोख पैसे काढण्याच्या प्रक्रियेत एसबीआयने सुधारणा केली आहे. एसबीआयच्या एटीएम मशीनमधून रोख पैसे काढताना आता तुम्हाला ओटीपी टाकावा लागणार आहे. हा ओटीपी (OTP) तुम्हाला बँकेतल्या तुमच्या नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवर (Registered Mobile Number) मिळेल आणि तुमच्या एटीएम पिननंतर तो टाकणं आवश्यक असणार आहे. तुम्ही हा OTP टाकला नाही, तर तुम्ही पैसे काढू शकणार नाही.

 

समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्या कार्डमधून (ATM Card) पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती तुमच्या परवानगीशिवाय पैसे काढू शकणार नाही. कारण आता तुमच्या मोबाइल नंबरवर येणारा OTP यामध्ये महत्त्वाचं कार्य बजावणार आहे. त्यामुळे कोणत्याही आनोळखी व्यक्तीला OTP शिवाय तुमच्या SBI एटीएमवरुन पैसे काढता येणार नाही.

SBI च्या माहितीनूसार, एटीएममधून रोख रक्कम काढण्याबाबतच्या सुरक्षेत एक नवीन स्तर वाढवल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank Of India) म्हटलं आहे. हे फीचर फक्त आणि फक्त (SBI ATM) मशीन मधून पैसे काढतानाच काम करेल. तुम्ही SBI चे ग्राहक असाल आणि इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे फीचर काम करणार नाही. याचा अर्थ असा की तुम्ही इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढले तर तुम्हाला OTP टाकण्याची गरज पडणार नाही.

 

असं वापरा फीचर –

– सर्वप्रथम तुम्हाला SBIच्या ATM मध्ये जावं लागेल.

– पहिल्याप्रमाणे पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

– यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल.

– मोबाइल नंबरवर आलेला OTP हा एटीएम मशीनच्या स्क्रीनवरच्या बॉक्समध्ये टाकावा.

– यानंतर तुम्ही पैसे काढू शकाल.

 

Web Title :- SBI | sbi otp based cash withdrawal know step by step how to withdraw money

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Lohegaon Airport | लोहगाव विमानतळावरील रनवे पासूनच काही अंतरावरील खड्ड्यामध्ये सांडपाणी; उघड्यावरील सांडपाणी व्यवस्थेमुळे ‘विमानांना’ धोका

 

Coronavirus | ‘कोरोना’वर नैसर्गिक प्रतिकारशक्ती लसीपेक्षाही अधिक प्रभावी; अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष

 

Sanjay Raut | ‘फडणवीसांची अवस्था म्हणजे कोणी खुर्ची देता का…’ – शिवसेना खासदार संजय राऊत