14 सप्टेंबरपर्यंत SBI मध्ये करा स्पेशल डिपॉझिट, जास्त व्याजासह मिळतील अनेक मोठे फायदे; जाणून घ्या

नवी दिल्ली : SBI | स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने SBI (State Bank of India) ने ग्राहकांना एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट (SBI Platinum Deposits)ची विशेष सुविधा देण्याची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत ग्राहकांना 15 बीपीएसपर्यंत जास्त व्याजाची सुविधा मिळत आहे. SBI Platinum Deposits च्या अंतर्गत ग्राहक 75 दिवस, 525 दिवस आणि 2250 दिवसांसाठी पैसे फिक्स्ड करू शकतात. या ऑफरचा फायदा 14 सप्टेंबरपर्यंत घेता येईल. म्हणजे केवळ 7 दिवसांचा वेळ शिल्लक आहे.

योजनेत किती फायदा मिळेल आणि कोणत्या दराने मिळेल व्याज –

सामान्य जनतेसाठी एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिटवर व्याजदर

– प्लॅटिनम 75 दिवस – 3.95 टक्के

– प्लॅटिनम 525 दिवस – 5.10 टक्के

– प्लॅटिनम 2250 दिवस – 5.55 टक्के

Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना टोल माफ

सिनियर सिटीजन्ससाठी एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिटवर व्याजदर

– प्लॅटिनम 75 दिवस – 4.45 टक्के

– प्लॅटिनम 525 दिवस – 5.60 टक्के

– प्लॅटिनम 2250 दिवस – 6.20 टक्के

पैसे करू शकता फिक्स्ड

SBI च्या प्लॅटिनम डिपॉझिट (Platinum Deposits) स्कीममध्ये पैसे फिक्स्ड करू शकता. तर NRE आणि NRO टर्म डिपॉझिट सह डोमेस्टिक रिटेल टर्म डिपॉझिट्स (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) वर या स्कीमचा फायदा घेऊ शकता.

कोणत्या मोडमध्ये मिळते पेमेंट

ग्राहकांना टर्म डिपॉझिट मध्ये मंथली आणि तिमाही आधारवर पेमेंट केले जाते. याशिवाय स्पेशल टर्म डिपॉझिट मध्ये ग्राहकांना मॅच्युरिटीवर व्याजाचे पेमेंट केले जाते. रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.

SBI स्पेशल FD scheme for senior citizens

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयच्या स्पेशल एफडीला वुई केयर नावाने ओळखले जाते. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर एक्स्ट्रा 30 बीपीएस व्याज देते. जर कुणी ज्येष्ठ नागरिक स्पेशल FD स्कीम अंतर्गत फिक्स्ड डिपॉझिट करत असेल तर FD वर लागू व्याजदर 6.20 टक्के असेल.

सामान्य जनतेसाठी लेटेस्ट एफडी रेट्स (SBI latest FD interest rates)

– 7 दिवस ते 45 दिवस – 2.9 टक्के

– 46 दिवस ते 179 दिवस – 3.9 टक्के

– 180 दिवस ते 210 दिवस – 4.4 टक्के

– 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी – 4.4 टक्के

– 1 वर्षापासून 2 वर्षापेक्षा कमी – 5 टक्के

– 2 वर्षापासून 3 वर्षापेक्षा कमी – 5.1 टक्के

– 3 वर्षापासून 5 वर्षापेक्षा कमी – 5.3 टक्के

– 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत – 5.4 टक्के

हे देखील वाचा

Crime News | हनीट्रॅपद्वारे दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा गंडा; यवतमाळमधील एकास अटक

Jalgaon Crime | नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर; आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्य सुत्रधाराला अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  SBI | sbi special fixed deposit scheme and platinum deposits will end 14 september 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update