SBI नं जिंकलं कोटयावधी ग्राहकांचं मन, कर्जाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | कोरोना महामारीच्या संकटानंतर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि एकुणच स्थिती सुधारण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) खातेधारकांना एक मोठी सूट दिली आहे.

एसबीआयने व्याजदरात मोठी कपात करून कर्ज स्वस्त केली आहेत (SBI has reduced interest rates and made loans cheape). फेस्टिव्ह सीझनची सुरुवत पाहता एसबीआयने बेस रेटमध्ये 5 बेसिक पॉईंट किंवा 0.05 टक्केची कपात केली आहे. या कपातीनंतर SBI चा बेस रेट 7.45 टक्के झाला आहे. नवीन दर 15 सप्टेंबर म्हणजे आजपासून लागू झाले आहेत.

याशिवाय SBI ने आपला प्राईम लेंडिंग रेटसुद्धा 5 बीपीएस कमी करून 12.20 टक्के केला आहे. मागील आठवड्यात कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा होम लोनच्या दरात 15 बेसिस पॉईंटची कपात केली करून तो 6.5 टक्के केला होता, जो बँकिंग इंडस्ट्रीच्या सर्वात कमी दरांपैकी एक आहे.

तर, एसबीआयकडून व्याजदरात या कपातीचा फायदा त्यांच्या ग्राहकांना मिळेल. एसबीआयच्या ग्राहकांना आता होम लोन, ऑटो लोनसह अनेक प्रकारच्या कर्जाचा मासिक हप्ता कमी होऊ शकतो.

यापूर्वी एप्रिलमध्ये एसबीआयने होम लोनच्या दरात कपात करत 6.70 टक्के केला होता.
सोबतच महिला ग्राहकांना 0.05 टक्केची अतिरिक्त सूट देण्याची घोषणा केली होती.
बेस रेट एक मिनिमम व्याजदर असतो, ज्याच्या खालील दरात कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही.
सध्या MCLR रेट 6.55-7.00 टक्के आहे.

Web Titel :- SBI | sbi won hearts customers took big decision regarding loan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

UP Election | काँग्रेसचा नवा फॉर्म्युला ! तिकिट हवं असेल तर 11 हजार रुपये अन् ‘या’ 7 प्रश्नांची द्या उत्तरं

Baramati Crime | दुर्देवी ! अंजनगावात शेततळ्यात बुडून माय-लेकींचा मृत्यू

Dr. Narendra Dabholkar Murder Case | अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील 5 आरोपींवर आज आरोप निश्चित; ‘त्यांना’ मात्र गुन्हा कबूल नाही