नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | कोरोना महामारीमुळे सध्या नोकरी मिळणे अवघड झाले आहे. त्यातच कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. अशावेळी जर तुम्ही काही पैशांची गुंतवणुक करून दरमहिना पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) म्हणजेच एसबीआय तुम्हाला 60,000 रुपये महिना कमावण्याची संधी देत आहे. तुम्ही एसबीआयची एटीएम फ्रेंचायजी घेऊन चांगली कमाई करू शकता.
जर तुम्हाला फ्रेंचायजी घेण्यात रस असेल तर तुमच्याकडे किमान 50-80 वर्ग फुटाची जागा असावी. इतर एटीएमपासून त्याचे अंतर 100 मीटर असावे. ती अशी जागा असावी, जी लोकांना लांबूनही दिसेल.
– हे कागदपत्र आवश्यक
– तुमच्याकडे आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड असावे.
– अॅड्रेस प्रूफसाठी रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असावे.
– बँक अकाऊंट आणि पासबुकसुद्धा आवश्यक आहे.
– फोटोग्राफ, ई-मेल आयडी, फोन नंबर द्यावा लागेल.
– GST नंबरची सुद्धा आवश्यक आहे.
– असा करा अर्ज
एसबीआय एटीएमची फ्रेंचायजी काही कंपन्या पुरवतात. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर व्हिजिट करून अप्लाय करू शकता. भारतात एटीएम लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट Tata Indicash, Muthoot ATM आणि India One ATM कडे आहे. यासाठी तुम्ही या सर्व कंपन्यांच्या वेबसाइटवर ऑनलाइन लॉगिन करून एटीमसाठी अप्लाय करू शकता.
एकुण 5 लाख भरावे लागतील
यामध्ये टाटा इंडिकॅश सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. यामध्ये 2 लाख सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर फ्रेंचायजी मिळते, जे रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून जमा करावे लागतात. अशाप्रकारे एकुण 5 लाख रुपये द्यावे लागतील.
प्रत्येक ट्रांजक्शनवर मिळते कमिशन
उत्पन्नाबाबत बोलायचे तर प्रत्येक कॅश ट्रांजक्शनवर 8 रुपये आणि नॉन कॅश ट्रांजक्शनवर 2 रुपये मिळतात. वार्षिक आधारावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 33-50 टक्के आहे.
इतके मिळेल उत्पन्न
जर एटीएमद्वारे दररोज 250 ट्रांजक्शन झाले, ज्यामध्ये 65 टक्के कॅश ट्रांजक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रांजक्शन असेल तर मंथली इन्कम 45 हजार रुपयांच्या जवळपास होईल. जर दररोज 500 ट्रांजक्शन झाले सुमारे 88-90 हजारचे कमीशन होईल.
Web Titel :- SBI | sbis explosion now you also earn 60 thousand rupees month sitting home
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update