खुशखबर ! SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट, मार्च 2022 पर्यंत मिळेल ‘या’ विशेष योजनेचा लाभ; जाणून घ्या

0
197
sbis special scheme we care fixed deposit can be availed till march sbi senior citizen scheme
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  SBI भारतीय स्टेट बँकेने (SBI) ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली SBI ‘WECARE’ फिक्स्ड डिपॉझिट योजनेची मुदत पुढील वर्षी मार्चच्या अखेरपर्यंत वाढवली आहे. अलिकडेच बँकेने आपल्या लोन सेगमेंटमध्ये सुद्धा अनेक ऑफर्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये होम लोनचे व्याजदर कमी करणे प्रमुख आहे.

एसबीआयने स्कीम डेट पुढे ढकलली (sbi senior citizen scheme)

एसबीआयने आपल्या वेबसाइटवर उल्लेख केला आहे की, रिटेल टर्म डिपॉझिट सेगमेंटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एसबीआय वुईकेयर डिपॉझिट योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अतिरिक्त 0.30 टक्के व्याजदर दिला जातो. आता ही योजना 31 मार्च, 2022 पर्यंत वाढवली आहे.

काय आहेत बँक व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयची विशेष एफडी योजना-वुई केयरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्ष आणि त्यापेक्षा जास्तीच्या कालावधीसाठी त्यांच्या एफडीवर अतिरिक्त 30 बीपीएस व्याजदर देते.

सध्या एसबीआय सामान्य जनतेसाठी पाच वर्षाच्या एफडीवर 5.4 टक्के व्याजदर देत आहे.

जर कुणी ज्येष्ठ नागरिक स्पेशल स्कीम अंतर्गत फिक्स्ड डिपॉझिट करत असेल तर त्यास लागू व्याजदर 6.20 टक्के असेल.

हे दर 8 जानेवारी 2021 पासून प्रभावी आहेत.

 

Web Title : SBI | sbis special scheme we care fixed deposit can be availed till march sbi senior citizen scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील नगररोड परिसरात डेंग्यूचा उद्रेक, अनेकांना डेंग्यू सदृश्य ताप

Employment Exchange | खुशखबर ! आता ज्येष्ठ नागरिकांना नोकरी देण्यासाठी मोदी सरकार उचलतंय ‘हे’ मोठं पाऊल, जाणून घ्या

Manohar Mama Bhosale | अबब ! मनोहरमामा भोसले यांच्या बँक अकाऊंटमध्ये ‘इतके’ लाख रुपये कुठून आले?