SBI SCO Recruitment 2021 । सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील एक मोठी असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये युवकांना नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे. जे उमेदवार सरकारी नोकरी (Government jobs) करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत SBI स्पेशलिस्ट कॅडर अधिकारी (SBI Specialist cadre officers) आणि मॅनेजर पदासाठी अर्ज केला नसेल त्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. (SBI SCO Recruitment 2021)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

कोण करू शकतं अर्ज ?
– इंजिनियरियन फायर :
यूजीसीकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICT द्वारे अनुक्रमित संस्थानातून नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (NFSC), नागपुरमध्ये BE (फायर) या B.Tech (Safety and fire engineering) / B.Tech (Fire Technology and Safety Engineering) / B.Sc. (फायर) असणे आवश्यक. इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स (INDIA / UK) मधून डिग्री, NFSC नागपूरहून डिव्हीजनल ऑफिसर्स कोर्समध्ये डिग्री असणे आवश्यक.

– मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि MBA / PGDM . याशिवाय, मानव संसाधन क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रमाणपत्रे असणे आवश्यक. बँकर्स / NBFC (1 फेब्रुवारी 2021 पर्यंत) मानव संसाधन क्षेत्रात कमीतकमी 7 वर्षांचा अनुभव (इंटर्नशिप सहित) आवश्यक.

Maharashtra Government। ओबीसी आरक्षण आदेशाच्या अंमलबजावणीस तूर्त स्थगिती द्या

तपशील –
या नोकरीअंतर्गत जाहिरातींची संख्या CRPD / SCO-FIRE / 2020-21/32 आणि CRPD / SCO / 2021-22 / 06 अंतर्गत क्रमश: (इंजिनियर) (फायर) आणि मॅनेजर (नोकरी कुटुंब आणि उत्तराधिकारी योजना) समाविष्ट आहेत. इंजिनियर (फायर) आणि मॅनेजरच्या पदांच्या एकूण 16 जागा रिक्त.

डिसेंबर 2020 मध्ये सुरू झाले अर्ज –
रेग्यूलर बेसिसवर SCO भरतीसाठी डिसेंबर 2020 रोजी अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाची अखेरची तारीख 11 जानेवारी 2021 होती. अधिकृत नोटिसनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज भरला होता त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही.

असा करा अर्ज –
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ  https://bank.sbi/web/careers अथवा https://www.sbi.co.in/web/careers वर जाऊन स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक.

निवड प्रक्रिया –
योग्य उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारे होईल. शॉर्टलिस्टिंग, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे योग्य उमेदवारास मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत 100 गुणांची असणार आहे. निवडण्याचा अधिकार बँकेकडे असणार आहे.

नवीन अर्ज सुरुवात – 15 जून

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून

अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in/ Careers

Wab Title : sbi sco recruitment 2021 here full bank jobs know about it

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena Bhavan | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, म्हणाले – ‘शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका’

भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू