देशातील सर्वात मोठ्या बँकेचा इशारा, उचलू नका फोन अन्यथा रिकामं होईल तुमचं अकाऊंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक ट्विट जारी केले आहे. ट्वीटद्वारे बँकेने सर्व ग्राहकांना सतर्क केले आहे की, आजकाल बरेच लोक एसबीआयच्या नावाने लोकांना कॉल करीत आहेत आणि त्यांची वैयक्तिक माहिती विचारत आहेत. आपल्यालाही अश्या प्रकारचा फोन आला तर सावधगिरी बाळगा आणि आपली कोणतीही माहिती व्हेरीफाईड केल्याशिवाय शेयर करू नका. आपण असे न केल्यास आपले बँक खाते रिक्त होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये स्वत: ला एसबीआय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या कॉलरने ग्राहकाच्या खात्यातून 2.22 लाख रुपये उडवले. त्यानंतर हे प्रकरण बँकेपर्यंत पोहोचले असता समजले कि, तो फसवणूक करणारा होता.

केवायसी व्हेरिफाईच्या नावे येतायेत फोन
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांना सांगितले की, काही सायबर ठग बँक अधिकारी बनून केवायसी व्हेरीफिकेशनच्या नावाखाली लोकांना कॉल करीत आहेत आणि त्यांना माहिती मिळताच त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात आहेत. बँकेने स्पष्ट केले कि, अशा कॉल किंवा मेसेजपासून सावध रहा. एसबीआयने सांगितले की, फसवणूक करणारा आपला फोन किंवा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून आपला वैयक्तिक तपशील मिळवण्यासाठी फोन कॉल करतो किंवा मजकूर संदेश पाठवितो. आपल्याकडेही प्रकरणे असल्यास cybercrime.gov.in वर त्वरित अहवाल द्या.

10 रुपयांचे पेमेंट आणि 2.22 लाख गायब
एसबीआय ग्राहकाच्या बाबतीत असेच काहीसे घडले. वास्तविक, त्याला एक फोन आला. आणि ग्राहकाने त्याची माहिती सामायिक केली. त्यानंतर नेट बँकिंगद्वारे त्या व्यक्तीने खाते पडताळणीच्या नावाखाली 10 रुपये टाकले. त्यानंतर ग्राहकास मोबाइल बँकिंगद्वारे रक्कम भरण्यास सांगितले गेले. असे केल्यानंतर त्यांच्या खात्यातून 1.35 लाख रुपये वजा करण्यात आले. यानंतर कॉलरने डेबिट कार्डद्वारे 10 रुपये देण्यास सांगितले. यावेळी पुन्हा खात्यातून 72,000 रुपये वजा करण्यात आले. अशा प्रकारे ग्राहकांचे 2.22 लाख रुपये गायब झाले.