SBI कडून कोटयावधी ग्राहकांना झटका ! महिन्याभरात दुसर्‍यांदा FD वरील व्याजदरात ‘घट’, जाणून घ्या नवे रेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने बुधवारी सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याज दरात 0.40 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा मुदतीच्या ठेवीवर व्याज दर बँकेने कमी केला आहे. एसबीआयने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, एफडीवरील व्याज दरामधील हे बदल 27 मेपासून अंमलात आले आहेत. स्टेट बँकेने मोठ्या प्रमाणात ठेवींवर (दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त) व्याजदरही 0.50 टक्क्यांनी कमी केला आहे. मोठ्या प्रमाणात ठेवींवर सामान्य ठेवीदारांना बॅंक जास्तीत जास्त 3 टक्के दराने व्याज देईल. दरातील हे बदलही बुधवारपासून अंमलात आले आहेत.

नुकत्याच झालेल्या या दुरुस्तीनंतर आता एसबीआयला 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.9% व्याज मिळेल. त्याचबरोबर 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदत ठेवीवर बँक 3.9% दराने व्याज देईल. त्याचबरोबर 180 पेक्षा जास्त आणि एका वर्षापेक्षा कमी एफडीला आता 4.4 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर बँक एका वर्षापासून तीन वर्षांच्या एफडीवर 5.1 टक्के दराने व्याज देत आहे. एसबीआय तीन वर्ष ते पाच वर्षांच्या एफडीवर 5.3 टक्के दराने व्याज देईल. त्याचबरोबर पाच वर्ष ते दहा वर्षांच्या एफडीला 5.4 टक्के दराने व्याज मिळेल.

27 मे पासून सर्वसाधारण ठेवीदारांना (ज्येष्ठ नागरिक वगळता) दोन कोटींपेक्षा कमी रकमेच्या ठेवीवर बँक व्याज देईल:

7 दिवस ते 45 दिवस – 2.9%

46 दिवस ते 179 दिवस – 3.9%

180 दिवस ते एका वर्षासाठी – 4.4%

1 वर्ष ते तीन वर्षे – 5.1%

3 वर्षे ते 5 वर्षे – 5.3%

पाच वर्षे ते 10 वर्षे – 5.4%

त्याचबरोबर बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच वर्ष ते दहा वर्षांच्या एफडीवर बँक 6.20 टक्के दराने व्याज देईल.